हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने ७८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. आपल्या पहिल्या यादीमध्ये भाजपने माजी महिला कुस्तीपटू बबिता फोगट आणि योगेश्वर दत्त या दोन खेळाडूंना तिकीट दिले आहे. कुस्तीपटू बबिता फोगट आणि योगेश्वर दत्त यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. बबिता फोगटला दादरी तर योगेश्वर दत्तला सोनीपतमधील बरौदा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडी २८८ जागा लढवणार; उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
हरियाणा विधानसभेसाठीच्या पहिल्या यादीत ३८ विद्यमान उमेदवारांचा समावेश आहे. हरियाणा विधानसभेत एकूण ९० जागेवर निवडणुका लढवण्यात येणार आहेत. योगेश्वर दत्तने २०१२ मध्ये लंडनमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावले होते. या कामगिरीनंतर त्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
गोपीचंद पडळकरांची घरवापसी, काशिराम पवार यांचाही भाजप प्रवेश
दोन्ही कुस्तीपटूची हरियाणामध्ये मोठी लोकप्रियता आहे. त्यामुळे त्यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवल्याचा भाजपला कितपत भायदा होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.