पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हार्दिक पांड्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, भावनिक पोस्टसह शेअर केली माहिती

हार्दिक पांड्या

भारताचा अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्या पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. शनिवारी लंडनमध्ये त्याच्यावर पाठीची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. हार्दिक पांड्याने सोशल मिडियाच्या माध्यमातून भावनिक पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. 

पांड्याने रुग्णालयातील फोटोसह शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सांगितले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहलंय की 'सर्जरी यशस्वी झाली. तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेबद्दल धन्यवाद! मी लवरच परत येईन, मला विसरू नका! अशा भावनिक शब्दासह त्याने चाहत्यांना आपल्याबाबतची माहिती कळवली आहे.  

'रो'..हिट! शतकासह असा पराक्रम करणारा हिटमॅन पहिलाच फलंदाज

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत हार्दिक पांड्या मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. या मालिकेतच त्याच्या पाठीला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे त्याला कसोटी संघात स्थान मिळू शकले नाही. याशिवाय त्याला आता बांगलादेश विरुद्धच्या टी-२० मालिकेलाही मुकावे लागणार आहे.