पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर सौरव गांगुलीने केले भाष्य

हार्दिक पांड्या

टीम इंडियाचा अष्टपैलू हार्दिक पांड्या अद्याप तंदुरुस्त नसल्याच्या वृत्तास बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दुजोरा दिला आहे. हार्दिक देशांतर्गत क्रिकेटमध्येही खेळू शकणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत हार्दिकचा संघात समावेश केला जाईल, अशी अपेक्षा होती. मागीलवर्षी सप्टेंबरमध्ये हार्दिक अखेरचा सामना खेळला होता. ऑक्टोबरमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 

वर्कआऊटदरम्यान विराट कोहलीने केला स्टंट, पाहा VIDEO

२६ वर्षीय हार्दिक पांड्याला भारताच्या अ संघात न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सामन्यासाठी समावेश करण्यात आला होता. परंतु, नंतर त्याचे नाव मागे घेण्यात आले होते. त्याच्या जागी विजय शंकरचा संघात समावेश करण्यात आला. मुंबईमध्ये या महिन्याच्या सुरुवातीला हार्दिक ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी सराव करताना दिसला होता. 

शोएब अख्तर म्हणाला, भारतीय संघ निर्दयी बनत चाललाय

सौरव गांगुली म्हणाले की, हार्दिक आता देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठीही तंदुरुस्त नाही. तो सध्या बेंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. त्यामुळे त्याला न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेले नाही. 

IPLची फायनल मुंबईत, सामन्याच्या वेळेतही बदल नाहीः सौरव गांगुली

हार्दिक आता आयपीएलच्या मैदानावरच उतरेल, असे बोलले जात आहे. हार्दिकने मागीलवर्षी सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० सामना खेळला होता. त्याने अंतिम वनडे सामना वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. हार्दिकने ११ कसोटी, ५४ वनडे आणि ४० टी-२० मध्ये १७०० धावा केल्या आहेत. त्याने १०९ विकेटही घेतल्या आहेत.