भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या सर्बियाच्या मॉडेलने दांड्या उडवल्या आहेत. नव्या वर्षाच्या मुहूर्तावर पांड्याने नताशा स्टेनकोविचशी खास अंदाजात साखरपुडा केला. पांड्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे. नताशाने पांड्यासोबतचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओला चांगली पसंती मिळताना दिसत आहे. दुबईमध्ये त्यांनी साखरपुडा केल्याचे समजते.
अखेर नव्या वर्षात हार्दिकची नताशासोबतच्या प्रेमाला कबुली
नताशाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या तिला खास अंदाजात प्रपोज करताना दिसत आहे. यापूर्वी पांड्याने नताशासोबत एक फोटो शेअर केला होता. मात्र यात साखरपुड्यासंदर्भात कोणतीच माहिती त्याने दिली नव्हती. प्रेमाची कबुली देऊन त्याने जोडीदार निवडल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आणखी एक फोटो शेअर करत पांड्याने आपण #engaged असल्याचे जाहीर केले आहे. मै तेरा, तू मेरी जाने सारा हिंदुस्थान 01.01.2020 #engaged' या कॅप्शनसह त्याने साखरपुड्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.
'आयपीएलपेक्षा रणजी-हजारे ट्रॉफीचे नियोजन खेळाडूंसाठी घातक'
ऑगस्ट २०१९ पासून हार्दिक आणि नताशा यांच्यात प्रेमसंबंध असल्याची चर्चा रंगत होती. दोघे अनेकदा मीडियाच्या कॅमेऱ्यात कैदही झाले होते. पण त्यांनी जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली नव्हती. नच बलिए ९ च्या हंगामात दिसलेल्या नताशासाठी हार्दिक पांड्याने वोटही मागितल्याचे पाहायला मिळाले होते.