पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हार्दिक आणि क्रुणालने खरेदी केली महागडी 'लॅम्बॉर्गिनी'

हार्दिक आणि क्रुणालने खरेदी केली 'लॅम्बॉर्गिनी'

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या सध्या आपल्या केशरी रंगाच्या लॅम्बॉर्गिनी कारमध्ये फिरताना दिसतोय. हार्दिक आणि क्रुणाल वांद्रे येथील एका जिमच्या बाहेर केशरी रंगाच्या लॅम्बॉर्गिनी कारमध्ये दिसले. या कारबरोबरचे दोघांचे छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हार्दिक पांड्याने सध्या विश्रांती घेतली आहे. तो भारतीय संघाबरोबर वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेला नाही. 

पाकिस्तानात 'ना स्वातंत्र्य, ना सुरक्षा': ग्रँट फ्लॉवर

हार्दिकने विश्वचषकात टीम इंडियाकडून सर्व ९ सामने खेळले होते. त्याने २२६ धावा आणि १० विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर त्याला विंडीज दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली होती. पण त्याचा भाऊ क्रुणालला टी २० मालिकेसाठी संघात स्थान मिळाले होते. पांड्या बंधून ज्या लॅम्बॉर्गिनी कारमध्ये फिरताना दिसले. त्याची किंमत ३ ते ५ कोटी असल्याचे सांगण्यात येते. ही कार अत्यंत अत्याधुनिक आहे. याचे इंटिरिअरही जबरदस्त आहे. या कारमध्ये दोन व्यक्ती बसू शकतात.

Exclusive Interview : CWG बहिष्काराच्या मुद्यावर थेट राहीशी संवाद

विराट कोहलीकडे आहे पावणेतीन कोटींची कार

पांड्या बंधू ज्या लॅम्बॉर्गिनीमध्ये फिरत होते. त्याचे इंजिन ५१५ ते ५४४ किलोवॅट हॉर्सपॉवरचे आहे. पेट्रोलवर असणाऱ्या या कारच्या फ्यूएल टँकची क्षमता ही ९० लीटर आहे. या कारला ५ ते ७ किमी मायलेज आहे. जर पांड्या बंधुंनी ही कार खरेदी केली असेल तर ती भारतीय क्रिकेटपटूंमधील सर्वांत महागडी कार असेल. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीकडे सर्वांत महागडी कार पावणेतीन कोटींची आहे. तर कार आणि बाईकचा शौकिन असलेल्या धोनीने नुकताच जीप या कंपनीची ग्रँड शेरोकी एसयूव्ही खरेदी केलेली आहे. त्याची किंमत १ कोटी रुपयांहून अधिक आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Hardik Pandya and Krunal Pandya buy a brand new orange color Lamborghini Car Know the price and features