Happy Birthday Shikhar dhawan: भारतीय संघातील 'गब्बर' अर्थात शिखर धवन आज आपला ३४ वा वाढिवस साजरा करत आहे. टीम इंडियाच्या सलामीवीराला बीसीसीआयसह संघातील इतर सहकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या हटके अंदाजाने सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणाऱ्या शिखर धवनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! असे ट्विट बीसीसीआयने अधिकृत अकाउंटवरुन केले आहे.
पाक क्रिकेटर बुमराहला म्हणाला बच्चा, विराटवरही केलं भाष्य
Wishing the ever smiling and entertaining @SDhawan25 a very Happy Birthday 😁😁🎂🎂 #TeamIndia #HappyBirthdayShikhar pic.twitter.com/A7y3igWoSy
— BCCI (@BCCI) December 4, 2019
आयसीसी स्पर्धेत सर्वाधिक चांगली कामगिरी करणारा फलंदाज अशी त्याची ख्याती आहे. ५ डिसेंबर १९८५ रोजी जन्मलेल्या शिखर धवनने पदार्पणातील कसोटी सामन्यात १७४ चेंडूत १८७ धावांची धमाकेदार खेळी केली होती. याशिवाय त्याने २०१३ च्या चॅम्पियन चषक स्पर्धेत धावांची बरसात करत अनोखा विक्रम आपल्या नावे केला होता. धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला चॅम्पियन चषक स्पर्धा जिंकून देण्यात धवनने सिंहाचा वाटा उचलला होता.
Wishing the ever smiling and entertaining @SDhawan25 a very Happy Birthday 😁😁🎂🎂 #TeamIndia #HappyBirthdayShikhar pic.twitter.com/A7y3igWoSy
— BCCI (@BCCI) December 4, 2019
ICC Test Ranking: स्मिथला मागे टाकत कोहली पुन्हा अव्वलस्थानी
रोहितसोबत भारताच्या डावाची सुरुवात करतानाही अनेक विक्रम त्याने केले आहेत. सध्याच्या घडीला क्रिकेट जगतातील यशस्वी सलामीची जोडी म्हणून रोहित-धवन या जोडीकडे पाहिले जाते. सध्याच्या घडीला विडींजचा संघ भारत दौऱ्यावर असून उद्यापासून (६ डिसेंबर) सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतून धवनने माघार घेतली आहे. दुखापतीतून सावरुन तो एकदिवसीयमध्ये मैदानात उतरावा, अशीच त्याच्या चाहत्यांची इच्छा असेल.