पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सचिनच्या पराक्रमाची पुनरावृत्ती, हनुमा दिग्गजांच्या यादीत

हुनमा विहारी

विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात उपकर्णधार अंजिक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांच्यातील १११ धावांच्या नाबाद भागीदारीच्या जोरावर भारताने विंडीजसमोर ४६८ धावांचे डोंगराएवढे आव्हान ठेवले. दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या हनुमा विहारीनं दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केली.  या अर्धशतकासह हनुमा विहारीने तब्बल २९ वर्षांनी विक्रमादित्य सचिन तेंडुलकरने केलेल्या पराक्रमाची पुनरावृत्ती केली. 

IND vs WI 2nd Test: विंडीज संघ संकटात, भारताची विजयाकडे वाटचाल

दुसऱ्या कसोटी सामन्यातील नाबाद अर्धशतकासह त्याने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. त्याच्या या पराक्रमी कामगिरीमुळे त्याचे नाव तेंडुलकरसह अन्य दिग्गजांच्या यादीत समावेश झाले आहे. आशियाच्या बाहेर सहाव्या किंवा त्यानंतरच्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यानंतर शतक आणि अर्धशतकीय खेळी करण्याचा पराक्रम करणारा विहारी भारताचा पाचवा फलंदाज ठरला. यापूर्वी सचिन तेंडुलकर, मंसूर अली खान पतौडी, एमएल जयसिम्हा आणि पॉली उमरीगर या दिग्गजांनी असा पराक्रम केला आहे. 

IND vs WI: बुमराहचा भेदक मारा, हॅटट्रिकसह टिपले ६ बळी

#पॉली उमरीगर ५६ आणि १७२* vs वेस्टइंडीज, पोर्ट ऑफ स्पेन (१९६२)
#मंसूर अली खान पतौडी ६४ और १४८ vs इंग्लंड, लीड्स (१९६७)
#एमएल जयसिम्हा ७४ आणि १०१  ऑस्ट्रेलिया, ब्रिस्बेन (1968)
#सचिन तेंडुलकर  ६८ आणि ११९* vs इंग्लंड, मॅनचेस्टर (१९९०)
#हनुमा विहारी ११ आणि ५३* vs वेस्टइंडीज, जमैका (२०१९)

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Hanuma Vihari joins Sachin Tendulkar in elite list after 2nd innings half century in india vs west indies Jamaica test