पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कारवाई विरोधात दहशतवादी हाफिद सईदची कोर्टात धाव

हाफिज सईद

पाकिस्तानने दहशतवादाविरोधातील कारवाई अंतर्गत घेतलेल्या भूमिकेसंदर्भात ‘जमात-उद-दावा’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदने लाहोर उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सईदसोबत कुख्यात अब्दुर रहमान मक्की, आमिर हमजा, एम. यहया अजीज याच्यासह अन्य चार दहशतवाद्यांनी आपल्या विरोधातील कारवाईसंदर्भात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

हाफिजचा लष्कर-ए-तोयबा. अल कायदा या संघटनेशी कोणताही संबंध नाही. राज्य विरोधातील कोणत्याही कारवाईमध्ये आम्ही सहभागी नसल्याचे सांगत भारताच्या दबावामुळे आमच्यावर कारवाई करणे नैतिक नसल्याचे दहशतवाद्यांनी म्हटले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दिलेल्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानानने दहशतावदावर कारवाई करण्यास सुरूवात केली होती.

यात २००८ च्या मुंबई हल्ल्यातील सुत्रधार दहशतवादी हाफिज सईद याच्या संघटनेवर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली होती. हाफिज सईदची संघटना ‘जमात-उद-दावा’ आणि त्याला रसद पुरवणारी संस्था ‘फलाह-ए-इन्सानियत’ फाउंडेशनवर बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला होता.