कतारमध्ये २०२२ मध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषकासाठीच्या दुसऱ्या पात्रता फेरीतील भारत-ओमान यांच्यातील सामना गुवाहटीमध्ये खेळवला जाण्याची शक्यता आहे. भारतीय संघाला पात्रता फेरीमध्ये आशियाई संघामध्ये तुलनात्मकदृष्ट्या दुबळ्या संघाचे आव्हान असणार आहे. भारतीय संघ ग्रुप ई मध्ये कतार, ओमान, अफगानिस्तान आणि बांग्लादेश यांच्या गटात आहे.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या एका सूत्राने आयएएनएसला दिलेल्या माहितीनुसार, आयएसएल स्पर्धेनंतर भारतातील फुटबॉलमध्ये झालेल्या सुधारणेच्या जोरावर गुवाहटीच्या मैदानात पात्रता फेरीतील काही सामने खेळवणे शक्य होईल.
ते पुढे म्हणाले की, " आशियाई फुटबॉल महासंघाचे (एएफसी) अधिकारी लवकरच आयोजन स्थलाचे निरिक्षण करुन नियोजित मैदानाबाबत निर्णय घेतला जाईल. या पात्रता फेरीतील पहिला सामना गुवाहटीमध्ये खेळवला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
फिफा वर्ल्ड कप पात्रता: मेस्सीवर निलंबनाची कारवाई
यापूर्वी गुवाहाटीमध्ये २०१७ मध्ये १९ वर्षांखालील फिफा विश्वचषकातील सामने खेळवण्यात आले होते. गुवाहाटीशिवाय मुंबई फुटबॉल एरेना आणि कोलकाताच्या साल्ट लेक स्टेडियमवर पात्रता फेरीतील मेजवाणीसाठी विचार केला जाऊ शकतो.