पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अखेरच्या ४८ सेकंदात भारतीय महिलांनी ग्रेट ब्रिटनला नमवले

भारतीय महिला हॉकी संघ

भारतीय महिला हॉकी संघातील बचावपटू गुरजीत कौरने अखेरच्या मिनिटाला गोल नोंदवत भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. तिच्या भन्नाट कामगिरीच्या जोरावर भारताने ग्रेट ब्रिटेनला २-१ असे पराभूत केले.या सामन्यातील अखेरच्या मिनिटापर्यंत भारतीय संघ एका गोलने पिछाडीवर होता. त्यानंतर दमदार कमबॅक करत भारताने सामना खिशात घातला. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातील पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघानी सावध खेळ केला. 

धोनीला मर्जीनुसार खेळता येणार नाही : गंभीर

त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय महिलांनी चांगला खेळ दाखवला. चेंडूवर नियंत्रण ठेवत भारतीय संघाने अनेक पेनल्टीच्या संधी निर्माण केल्या. पण मँडी हिंचने चांगला बचाव केला. चौथ्या क्वार्टरमध्ये ४६ व्या मिनिटाला एमिली डेफ्रोंडने गोल नोंदवत ग्रेट ब्रिटनला आघाडी मिळवून दिली आहे.

Tennis: एस. नागल ब्युनस आयर्सच्या सेमीफायनलमध्ये

एका गोलने पिछाडीवर असताना शर्मीला देवीने गोल नोंदवत सामना बरोबरीत आणला. ४८ सेकंद उरले असताना भारताला पॅनल्टी मिळाली. गुरजीतने कोणतीही चूक न करता गोल डागत भारताला विजय मिळवून दिला. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी रंगणार आहे.