पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

श्रीलंकन संघ पाकमध्ये खेळण्यास 'राजी'

श्रीलंका संघ पाकिस्तानमध्ये कसोटी खेळण्यास तयार

श्रीलंकन क्रिकेट संघाने पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळण्याची तयारी दर्शवली आहे. श्रीलंकेच्या पाकिस्तान दौऱ्यासंदर्भातील सुरक्षितेबाबत खात्री करण्यासाठी श्रीलंकन बार्डाने आपली टीम पाकिस्तानमध्ये पाठवावी, असे पाक बोर्डाने म्हटले आहे.  

'द नेशन'च्या वृत्तानुसार, पाकिस्तान-श्रीलंका यांच्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान संयुक्त अरब अमीरात (युएई) मध्ये कसोटी मालिका नियोजित आहे. दोन कसोटी मालिकेतील एक सामना लाहोर किंवा कराचीमध्ये खेळण्याबाबत श्रीलंकेनं क्रिकेट बोर्डाने सहमती दर्शवली आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड दोन्ही कसोटी सामने पाकिस्तानमध्ये खेळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

धोनी १५ सदस्यीय संघात असला तरी टीम इलेव्हनमध्ये नसेल

२००९ मध्ये पाकिस्तान-श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली होती.  या हल्ल्यात श्रीलंका संघातील माजी खेळाडू महेला जयवर्धने, कुमार संगकारा आणि अन्य सहा खेळाडूंना किरकोळ दुखापतही झाली होती. या घटनेनंतर पाकिस्तानच्या क्रिकेटला चांगलाच फटका बसला. आयसीसीशी संलग्नित देशांनी पाकिस्तान दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला होता.  

आता मुख्य प्रशिक्षक निवडीवेळी विराटची मनमानी चालणार नाही