मानसिक अस्वस्थतेच्या कारणास्तव तडकाफडकी क्रिकेटपासून अनिश्चित काळासाठी दूर राहण्याचा निर्णय घेतेल्या ग्लेन मॅक्सवेल लवकरच कांगारुंच्या ताफ्यात सहभागी होण्याचे संकेत मिळत आहेत. त्याने विक्टोरिया संघाकडून सरावाला देखील सुरुवात केल्याचे वृत्त आहे. ऑक्टोबरमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान त्याने अनिश्चित काळासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता.
फुकाची बडबड करणे हीच त्यांची वृत्ती, इरफानने घेतली रझाकची शाळा
मानसिक संतुलन अस्थिर झाल्यामुळे विश्रांतीवर गेलेला मॅक्सवेल आगामी विश्वचषकात खेळणार की नाही यासंबंधी मोठे प्रश्नचिन्ही निर्माण झाले होते. अखेर तो राष्ट्रीय संघात परतण्याच्या तयारी लागला आहे. आतापर्यंत त्याने विक्टोरिया प्रीमियर लीगमध्ये तीन सामने खेळले आहेत.
पैशांची अफरातफर प्रकरणात मेस्सी पुन्हा गोत्यात
आस्ट्रेलियाच्या मार्कस हॅरिसने क्रिकेट डॉट कॉम डॉट एयूला दिलेल्या माहितीनुसार, मॅक्सवेल संघात पुनरागमन करण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. आठवड्याभरात तो कमबॅक करेल की नाही हे सांगणे कठिण आहेय पण लवकरच तो पुन्हा ऑस्ट्रेलियन संघाकडून खेळताना दिसेल, असा विश्वास हॅरिसने व्यक्त केला आहे.