पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video: IPL मध्ये कोट्यवधी उगाच मिळाले नाहीत हे मॅक्सवेलनं दाखवून दिलं

ग्लेन मॅक्सवेल

मानसिक तणावामुळे क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला  इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल) २०२० च्या लिलावात कोट्यवधींची किंमत मिळाली. किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याच्यासाठी तब्बल १० कोटी ७५ लाख रुपये इतकी रक्कम मोजली. मॅक्सवेलने मानसिक तणावामुळे क्रिकेटमधून ब्रेक घेतला असताना त्याच्यावर लावलेली बोली आश्चर्यकारक अशीच होती. मात्र, लिलावाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्यावर तगडी किंमत उगाच मोजलेली नाही, हे मॅक्सवेलने दाखवून दिले. 

IPL 2020: 'काय पो छे' मधील बीडचा कलाकार मुंबई इंडियन्सकडून खेळणार

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बीग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्सकडून खेळणाऱ्या मॅक्सवेलने आपण तणावातून बाहेर आल्याचे दाखवून दिले. ब्रिसबेन हिट विरुद्धच्या सामन्यात मॅक्सीने ३९ चेंडूत ८३ धावांची दमदार खेळी केली. त्याच्या या खेळीत ७ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. या सामन्यात ब्रिसबेनच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. 

IPL लिलावावेळी दिसलेली 'ती' मिस्ट्री गर्ल कोण आहे ?

मॅक्सवेलच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर मेलबर्न स्टार्सने निर्धारित २० षटकात १६७ धावांपर्यंत मजल मारली होती. या धावांचा पाठलाग करताना ब्रिस्बेन हिट संघ निर्धारित २० षटकात ८ बाद १४५ धावांपर्यंत मजल मारु शकला. मॅक्सवेलची खेळी किंग्ज इलेव्हन पंजाबचा निर्णय सार्थ ठरवणारी तर आहेच शिवाय ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा लक्षात घेता ऑस्ट्रिलियन क्रिकेटसाठीही ही खेळी दिलासा देणारी ठरेल. आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी कोलकातामध्ये पार पडलेल्या लिलावात ग्लॅन मॅक्सवेलसाठी पंजाब आणि दिल्लीच्या संघात चढाओढ पाहायला मिळाली. अखेर पंजाबने बाजी मारत मॅक्सवेलला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले.