पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मेरी कोमशी लढू द्या! भारतीय महिला बॉक्सरचे क्रीडा मंत्र्यांना पत्र

मेरी कोम

जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेतील माजी ज्यूनिअर निकहत झरिनने जागतिक चॅम्पियन स्पर्धेत विश्वविक्रम प्रस्थापित करणाऱ्या मेरी कोमला चॅलेंज देण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात तिने  केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांना पत्र लिहिले आहे.  

रशियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत निकहतच्या ऐवजी भारतीय बॉक्सिंग संघाने मेरी कोमला संधी दिली होती. ५१ किलो वजनी गटात मेरी कोमने कांस्य पदकाची कमाई देखील केली. या जोरावर ऑलिम्पिकसाठी तिने आपली दावेदारी पक्की केली आहे. मात्र ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी संघ निवड करण्यापूर्वी मेरी कोमसोबत ट्रायल सामना खेळण्याची संधी मिळावी, अशी इच्छा निकहत झरिनने व्यक्त केली आहे. टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी चीनमध्ये पात्रता फेरीतील सामने रंगणार आहेत.

INDvSA: राग नडला! दुखापतीमुळे मार्करम कसोटीला मुकणार

निकहतने क्रीडा मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानुसार, मी लहान असल्यापासून मेरी कोमला आदर्श मानते. मला तिच्याप्रमाणे महान खेळाडू होण्यासाठी न्याय मिळावा यासाठी मी तिच्याविरुद्ध रिंगणात उतरायला तयार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत २३ सुवर्ण पदके मिळवणाऱ्या माइक फेल्प्स प्रत्येकवेळी पात्रता सिद्ध करतो. आपल्याकडेही अशाच प्रकारे खेळाडूला न्याय मिळायला हवा, असा उल्लेख निकहतने आपल्या पत्रात केला आहे.

मेस्सीचा आणखी एक पराक्रम, हॅटट्रिकसह पुरस्काराचा षटकार

भारतीय बॉक्सिंग महासंघाने पात्रता फेरीत ट्रायल सामना खळण्यास सांगितल्यास मी रिंगणात उतरायलाही तयार असल्याचे यापूर्वीच मेरी कोमने सांगितले आहे. उल्लेखनिय आहे की, ऑलिम्पिक संघ निवडीवेळी आपला विचार व्हावा यासाठी निकहतने क्रीडा मंत्र्यांकडे दाद मागितली असली तरी आंतरराष्ट्रीय महासंघाच्या आदेशाशिवाय केंद्रीय क्रीडा मंत्रालय राष्ट्रीय महासंघाच्या कारभारात हस्तक्षेप करु शकत नाही. त्यामुळे निकहतची मेरी कोमला चॅलेंज देण्याची इच्छा पूर्ण होणे अवघड आहे.