पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जेटली माझ्यासाठी वडिलांसमान होते, गंभीरचे भावूक ट्विट

जेटलींच्या निधनानंतर गंभीर सेहवागसह दिग्गज क्रिकेटर्संनी वाहिली श्रद्धांजली

Arun Jaitley Passes Away: माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे आज (शनिवार) दिर्घ आजाराने निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी  अखेरचा श्वास घेतला. राजकीय क्षेत्रासह क्रिडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. जेटली यांच्या निधनानंतर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि विरेंद्र सेहवाग यांनी भावूक ट्विट केले आहे.  

माजी क्रिकेट आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांनी ट्विटच्या माध्यमाधून जेटलींना श्रद्धांजली वाहिली. गंभीरने भावूक ट्विटमध्ये लिहिलंय की, वडील आपल्याला बोलायला शिकवतात तर वडीलतुल्य व्यक्ती कसे बोलायचे ते शिकवते. वडील आपल्याला चालायला शिकवतात तर वडीलतुल्य व्यक्ती कसे चालावे याचे धडे देते. वडील आपल्याला नाव देतात तर वडीलतुल्य व्यक्ती आपल्याला ओळख देते. अरुण जेटली माझ्यासाठी वडिलांप्रमाणे होते, अशा भावूक शब्दांत गंभीर यांनी श्रद्धांजली वाहिली. 

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

सेहवागने ट्विटमध्ये लिहलंय की, जेटीलींच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. दिल्लीच्या अनेक क्रिकेटर्संनी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले. यात  जेटलींचे योगदान महत्त्वपूर्ण होते, असे सेहवागने म्हटले आहे. आकाश चोप्रा यांनी अरुण जेटलींना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या क्रिकेट क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख केला आहे. ते एक सच्चे क्रिकेट प्रेमी होते. १९ वर्षांखालील गटात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नावे त्यांना तोंडपाठ असायची, या आठवणीला देखील चोप्रा यांनी उजाळा दिला. 

अरुण जेटली यांचा राजकीय प्रवास

उल्लेखनीय आहे की, जेटली यांनी १३ वर्षे दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. १९९९ पासून २०१२ पर्यंत जेटली यांनी दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षस्थानी होते. भारतीय संघातील अनेक दिग्गज क्रिकेटर्संना ओळख निर्माण करुन देण्यात जेटलींचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: gautam gambhir virender sehwag Cricket fraternity mourns the passing away of former finance minister Arun Jaitley