धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-२० आणि ५० षटकांच्या विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. या दोन्ही प्रकारात अंतिम सामन्यात माजी क्रिकेटर गौतम गंभीरने अविस्मरणीय अशी खेळी केली होती. २००७ च्या टी-२० विश्वचषकातील अंतिम सामन्यात गंभीरने ७५ धावांची खेळी केली होती. तर २०११ च्या मर्यादित षटकांच्या सामन्यात त्याने ९७ धावांचे योगदान दिले होते. अंतिम सामन्यात तीन धावांनी त्याचे शतक हुकले होते. हे शतक हुकण्याला धोनी जबाबदार असल्याचे गौतम गंभीरने म्हटले आहे.
हीच ती वेळ! डोपिंगमध्ये दोषी ठरलेल्या पृथ्वीच्या धमाकेदार 'कमबॅक'ची
'द लल्लनटॉप' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये गंभीरने विश्वचषकातील त्या ९७ धावांच्या खेळीच्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला की, मी प्रत्येक युवा खेळाडूंना सांगू इच्छितो की, ९७ धावांवर येईपर्यंत मी शतकाचा विचार केला नव्हता. माझ लक्ष श्रीलंकेने आमच्यासमोर ठेवलेल्या धावासंख्येकडे होते. त्यावेळी धोनी माझ्यासोबत होता. षटक संपल्यानंतर धोनीने तीन धावा करुन शतक पूर्ण कर, असा सल्ला दिला. त्याने मला शतकाची आठवण करुन दिली नसती तर कदाचित माझे शतक पूर्ण झाले असते. धोनीसोबतच्या चर्चेनंतर शतक करण्याच्या नादात मी थिसारा परेराच्या गोलंदाजीवर विकेट गमावली. धोनीने आपला खेळ कायम ठेवत कुलशेखरच्या गोलंदाजीवर षटकार खेचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
ICC Ranking: शमी- मयांकची टेस्ट कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी
गंभीर म्हणाला की, तीन धावा करुन शतक पूर्ण करण्याचा विचार जेव्हा माझ्या डोक्यात आला त्यामुळे माझा गोंधळ उडाला. त्यामुळे क्रिकेटरने नेहमी वर्तमान परिस्थितीवर लक्ष केंद्रीत करायला हवे. शतकाला हुलकाणी दिलेल्या तीन धावा मी कधीच विसरणार नाही, असेही गंभीरने म्हटले आहे.