पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रायडूच्या निवृत्तीवर गंभीर यांची 'खंबीर' भूमिका

गौतम गंभीर

भारताचे माजी सलामीवीर आणि नवनिर्वाचित भाजप खासदार गौतम गंभीर यांनी रायडूच्या निवृतीनंतर बीसीसीआयच्या निवड समितीला खडेबोल सुनावले आहेत. एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीच्या पाच सदस्यांनी मिळून त्यांच्या कारकिर्दीत जेवढ्या धावा केलेल्या नाहीत त्यापेक्षा अधिक धावा अंबाती रायडूच्या नावे आहेत, अशा गंभी शब्दांत निवड सिमितीच्या सदस्यांचा त्यांनी समाचार घेतला.

आयसीसी विश्वचषक स्पर्धेतून डावलल्याने अंबाती रायडूने बुधवारी कोणतेही कारण स्पष्ट न करता क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृती घेत असल्याचा मेल बीसीसीआयला केला. स्टार स्पोर्ट्स या वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना गंभीर म्हणाले की, "यंदाचा विश्वचषक स्पर्धेसाठीचा संघ निवडीवेळी निराशा झाली. रायडूने घेतलेला निर्णयाला निवड समिती जबाबदार आहे.'' 

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिले धोनीच्या निवृत्तीचे संकेत

इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगलेलेल्या विश्वचषक स्पर्धेत राखीव खेळाडूमध्ये रायडूचा समावेश असताना अष्टपैलू विजय शंकरच्या दुखापतीनंतर निवड समितीने रायडूकडे कानाडोळा करत मयंक अगरवालला संधी दिली. या निर्णयामुळे नाराज होऊनच रायडूने क्रिकेटला रामराम केले. 

गंभीर म्हणाले की, "रायडूच्या निवृत्तीचे वृत्त निराश करणारे होते. विश्वचषकातील दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी रायडूऐवजी पंत आणि मयंकची निवड करण्यात आली. त्याच्या जागी कोणीही असते तर त्याला वाईट वाटले असते."

नाराजीचा शेवट थेट निवृत्तीनं, रायडूचा क्रिकेटला 'रामराम'