पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मुला अजून POK बाकी आहे', गौतम गंभीरचे आफ्रिदीला 'परफेक्ट' उत्तर

एका क्रिकेट सामन्यातील गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदीचे छायाचित्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आणल्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला होता. आफ्रिदीच्या या टि्वटला क्रिकेटपटूचा खासदार झालेल्या गौतम गंभीरने त्वरीत त्याला प्रत्युत्तर दिले. आपल्या काळात आक्रमक शैलीचा फलंदाज राहिलेल्या गंभीरने उत्तर देताना आफ्रिदीला आरसा दाखवत पाकव्याप्त काश्मीरची आठवण करुन दिली. त्याचबरोबर चिंता करु नको मुला, आम्ही त्यावरही तोडगा काढू. यावेळी गंभीरने उपहासात्मकरित्या आफ्रिदीला 'मुला' असेही संबोधले. 

काश्मीरसाठी आमची प्राण देण्याची तयारी - अमित शहा

भारताने काश्मीरमधून कलम ३७० हटवत त्यांना मिळालेला विशेष राज्याचा दर्जाही संपुष्टात आणला. त्यावर आफ्रिदीने टि्वट करत संयुक्त राष्ट्रावर प्रश्न उपस्थित केला आणि अमेरिकेकडून मदतीची अपेक्षा केली होती. आफ्रिदीच्या या टि्वटला क्रिकेट जगतातून गंभीरने चोख उत्तर दिले.

गंभीरने आफ्रिदीला टॅग करत लिहिले की, मित्रांनो शाहिद आफ्रिदी एकदम ठीक आहे. तिथे अनुत्तेजित आक्रमकता आहे. तिथे मानवतेविरोधात गुन्हे केले जात आहेत. त्यांनी ते समोर आणले पाहिजे. यासाठी त्यांचे कौतुक केले पाहिजे. गंभीरने या वाक्यापुढे टाळ्यांच्या इमोजीचा वापर केला आहे.

... हा तर सत्तेचा गैरवापर, राहुल गांधींची कलम ३७० वरून सरकारवर टीका

त्यानंतर त्याने पुढे लिहिले की, मी फक्त यामध्ये एक गोष्ट लिहिण्यास विसरलो आहे की, हे सर्व पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये होत आहे. चिंता करु नका. आम्ही यावरही तोडगा काढू मुला!!

तत्पूर्वी आफ्रिदीने आपल्या टि्वटमध्ये लिहिले आहे की, काश्मिरींना संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावाच्या आधारावर त्यांना अधिकार द्यायला हवेत. स्वातंत्र्याचा अधिकार आपणा सर्वांना आहे. संयुक्त राष्ट्राची उभारणी का केली गेली आहे आणि ते झोपले आहेत का? काश्मीरमध्ये सातत्याने मानवताविरोधी अनुत्तेजित आक्रमकता आणि गुन्हे होत आहेत. त्यावर लक्ष दिले पाहिजे. डोनाल्ड ट्रम्प यांनी याप्रकरणी मध्यस्थाची भुमिका पार पडली पाहिजे.

कलम ३७० : अमित शहा यांना कोणाची मदत होती माहितीये?