पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आफ्रिदीच्या आत्मचरित्रातील फटकेबाजीनंतर गंभीरचा मास्टर स्ट्रोक

२००७ मध्ये कानपूरच्या मैदानात गंभीर आणि आफ्रिदी यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते.

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांनी क्रिकेटचे मैदान सोडल्यानंतरही दोघांच्यातील शाब्दिक युद्ध थांबलेले नाही. ट्विटरच्या माध्यमातून अनेकदा ते आपल्याला पाहायला मिळते. आफ्रिदीने लिहिलेल्या आत्मचरित्राने आता पुन्हा दोघांच्यातील वादात ठिणगी पडली आहे. आफ्रिदीने आपल्या आत्मचरित्रातून गंभीरसंदर्भात टिपण्णी केली आहे. याला गंभीरने ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

VIDEO: रोहितच्या बोलंदाजीनं टीकाकारांची बोलती बंद

'तू एक उन्माद निर्माण करणारा व्यक्ती आहेस. तरीही आम्ही पाकिस्तानला वैद्यकीय पर्यटनासाठी व्हिसा देत आहोत. मी तुला वैयक्तिकपणे मनोचिकित्सकाकडे घेऊन जाईल, अशा आशयाचे ट्विट करत गंभीरने आफ्रिदीला प्रत्युत्तर दिले आहे. आफ्रिदीने आपल्या 'गेम चेंजर' या  आत्मचरित्रातून गंभीरच्या चरित्र्यावर टिपण्णी केली आहे. गंभीरचे स्वत:चे असे काही खास व्यक्तिमत्व नाही. तो स्वत:ला सर डॉन ब्रँडमन आणि जेम्स बाँड या दोन दिग्गजांचे मिश्रण समजतो. गंभीरच्या मैदानातील कृतीला प्रतिस्पर्धी म्हणता येणार नाही. त्याची कारकिर्द नकारात्मकतेने भरलेली होती, असा उल्लेख आफ्रिदीने आपल्या पुस्तकात केला आहे. काही प्रतिस्पर्धी व्यावसायिक असतात आणि काही वैयक्तिक प्रतिस्पर्धी असतात, असा उल्लेख करत गंभीर माझा वैयक्तिक प्रतिस्पर्धी असल्याचे आफ्रिदीने या पुस्तकात म्हटले आहे. 

 

२००७ मध्ये कानपूरच्या मैदानात रंगलेल्या भारत- पाकिस्तान यांच्यातील एकदिवसीय सामन्यात गंभीर आणि आफ्रिदीमध्ये मैदानातच वाद झाला होता. धाव घेताना गंभीर थेट आफ्रिदीच्या अंगावर गेल्याचे पाहायला मिळाले होते. या घटनेनंतर खेळांच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी आयसीसीने दोघांनाही दंड ठोठावला होता. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:gautam gambhir reacts to shahid afridis remarks says will personally take him to a psychiatrist