पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गंभीर स्ट्रोक : हा बॅकअप मॅन पंतचं पॅकअप करु शकतो

ऋषभ पंत आणि लोकेश राहुल

भारतीय संघाचे माजी सलामीवीर आणि भाजपचे विद्यमान खासदार गौतम गंभीर यांनी युवा यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पंतच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत फलंदाजी आणि यष्टिमागे लोकेश राहुलने केलेल्या कामगिरीचेही गंभीर यांनी कौतुक केलय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत लोकेश राहुलने तिसऱ्या क्रमांकावर, पाचव्या क्रमांकावर आणि सलामीला फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. एवढेच नाही तर पंतच्या अनुपस्थितीत त्याने यष्टिमागेही चोख भूमिका बजावली.  

INDvNZ: खंदा फलंदाज खांद्याच्या दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्याला मुकणार

गंभीर यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या स्तंभलेखातून पंत आणि लोकेश राहुलच्या भविष्यावर भाष्य केले आहे. त्यांनी लिहलंय की, मी सर्वप्रथम लोकेश राहुलविषयी बोलणे पसंत करेन, लोकेश राहुलच्या भात्यात उत्तम फटके आहेत. त्याचा फिटनसही कमालीचा आहे. त्याला उत्तम स्ट्रोक खेळण्याची कला अवगत आहे. मध्यफळीत तो अनमोल ठरु शकतो. त्यामुळे त्याला मोठ्या जबाबदारीसाठी तयार करण्याच गरज आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत लोकेश राहुलने ४७, ८० आणि १९ धावांची खेळी केली होती. यष्टिमागे त्याने चार झेलही टिपले होते.

न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारताचा प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त

पंतचा बॅकअप म्हणून संघात असलेल्या लोकेश राहुलने पंतच्या अनुपस्थितीत फलंदाजी आणि यष्टिमागे चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. न्यूझीलंड दौऱ्यात तो अशीच भूमिका बजावताना दिसू शकतो. असे गंभीर यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने देखील यासंदर्भात संकेत दिले होते. लोकेश राहुलला यष्टिमागची जबाबदारी दिली तर संघात संतूलन राहू शकते, असे कोहलीने म्हटले होते.  पंतविषयी गंभीर यांनी लिहलंय की त्याचा आत्मविश्वास पूर्वीपेक्षा खालवल्याचे दिसते. भारतीय संघात लोकेश राहुलला अधिक संधी मिळाली, तर पंत याकडे कसे पाहिलं हे माहित नाही. पण पंतसोबत चर्चा करुन त्याच्या खेळात आपण सुधारणा आणू शकतो, असा उल्लेखही गंभीर यांनी केला आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:gautam gambhir on rishabh pant and kl rahul after ind vs aus odi series india vs australia