पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धोनीला मर्जीनुसार खेळता येणार नाही : गंभीर

गंभीर आणि धोनी

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी नोव्हेबरमध्ये पुन्हा संघात कमबॅक करणार असल्याची चर्चा रंगत असताना माजी क्रिकेटर आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांनी त्याच्या निवृत्तीच्या मुद्यावर आपले मत मांडले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त कधी व्हावे, हा धोनीचा वैयक्तिक निर्णय असेल. पण त्याला आपल्या इच्छेनुसार विशिष्ट मालिकेतच खेळावे, अशी निवड करता येणार नाही, असेही गंभीर यांनी म्हटले आहे. निवृत्तीच्या निर्णयावर भावनिक नाही तर वास्तविकरित्या विचार करावा लागतो, असेही गंभीर यावेळी म्हणाले.  

VIDEO: सचिन तेंडुलकरने लतादीदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

गंभीर म्हणाले की, निवृत्तीचा निर्णय हा वैयक्तिक असतो, असे माझे प्रामाणिक मत आहे. निवड समितीने यासंदर्भात धोनीशी चर्चा करुन त्याच्या नियोजनाबद्दल जाणून घ्यायला हवे, असे गंभीर यांनी म्हटले आहे. भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करताना तुम्ही कोणत्या मालिकेत खेळणार किंवा नाही हे ठरवू शकत नाही, असा उल्लेखही गंभीर यांनी केला.

...तर टी-२० चे नेतृत्व रोहितकडे द्यावे : युवराज सिंग 

भारतीय संघाचे नेतृत्व करताना धोनी ज्याप्रमाणे भविष्याच्या संघ बांधणीसंदर्भात विचार करायचा त्याचप्रमाणे निवड समितीने धोनीसंदर्भात विचार करायला पाहिजे. २०२३ च्या विश्वचषकासाठी भारतीय संघात सर्वोत्तम यष्टिरक्षक निवडण्याची प्रक्रिया आतापासूनच सुरु करावी. त्यासाठी नवोदितांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करुन द्यावी, असेही गंभीर यावेळी म्हणाले.