पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धोनीची जागा कोण घेईल?, गौतम गंभीरने सांगितली तिघांची नावे

गौतम गंभीर आणि महेंद्रसिंह धोनी

सध्या भारतीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चर्चा महेंद्रसिंह धोनीचीच सुरु आहे. धोनीच्या निवृत्ती आणि भविष्याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. धोनी निवृत्ती घेईल की २०२० मध्ये होणाऱ्या टी २० विश्वचषकाची वाट पाहील ?  धोनी विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्त होईल, असे मत बहुतांश क्रिकेट पंडित आणि तज्ज्ञांचे होते. दरम्यान, धोनीच्या निवृत्तीनंतर कोण असा प्रश्न उपस्थितीत होणे स्वाभाविक आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने तीन खेळाडुंची नावे सांगितली आहेत. या तीनही नावांचा धोनीचा पर्याय म्हणून विचार केला जावा, असे त्यांनी म्हटले आहे. 

एका वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हटले की, जेव्हा धोनी कर्णधार होता. तेव्हा त्याने भविष्यातील क्रिकेटपटूंवर लक्ष दिले. आता क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची धोनीची वेळ आली आहे. अशावेळी टीम इंडियाला नव्या क्रिकेटपटूंना वाव दिला पाहिजे. 

गंभीरने भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या २०१२ च्या सीबी मालिकेचा उल्लेख करताना म्हटले की, धोनीची सचिन, गंभीर आणि सेहवागला वगळावे अशी इच्छा होती. कारण त्यांची तंदुरुस्ती आणि क्षेत्ररक्षण चांगले नव्हते. त्यावेळी त्याच्या म्हणण्यानुसारच झाले होते. आता पुन्हा एकदा बदलाची वेळ आली आहे. हीच योग्य वेळ आहे. भावनेच्या आहारी न जाता व्यावहारिक निर्णय घेतला गेला पाहिजे. 

'या' टीमवर आयसीसीने घातली बंदी

गौतम गंभीरने ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि ईशान किशन यांची नावे घेतली. धोनीचा पर्याय म्हणून यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे तो म्हणाला. एका खेळाडूला तो पुढचा विश्वचषक खेळू शकतो की नाही, हे पाहण्यासाठी त्याला किमान दीड वर्षे तरी वेळ दिला पाहिजे. 

भविष्याकडे पाहणे हे खूप महत्वाचे आहे. जेव्हा धोनी कर्णधार होता. तेव्हा त्यानेही भविष्यातील खेळाडूंवरच विश्वास दर्शवला होता. मला लक्षात आहे की, धोनीने त्यावेळी मला, सचिन आणि सेहवागला तुम्ही सीबी सीरिज खेळू शकत नाही, कारण तेथील मैदानं मोठी आहेत, असे म्हटले होते. त्याला विश्वचषकासाठी युवा खेळाडू हवे होते. त्यामुळे भावनेपेक्षा व्यावसायिक निर्णय घेण्याची हीच वेळ आहे. 

ICC 'हॉल ऑफ फेम'मध्ये सचिन तेंडुलकरचा समावेश

आता युवा खेळाडुंना तयार करण्याची वेळ आहे. मग तो पंत, संजू किंवा ईशान किंवा आणखी कोणी असो. ज्याच्यामध्ये योग्यता आहे, त्याला विकेटकिपिंगची संधी दिली पाहिजे, असेही तो म्हणाला.