पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

क्रिकेटपेक्षा प्रदूषणाची चिंता करायला हवी,'गंभीर' प्रतिक्रिया

गौतम गंभीर

विद्यमान खासदार आणि माजी क्रिकेटर गौतम गंभीर यांनी दिल्लीतील प्रदूषणावर गंभीर प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली वासियांनी दिल्लीत होणाऱ्या क्रिकेट सामन्यापेक्षा शहरातील प्रदूषणाच्या मुद्याकडे गांभिर्याने पाहायला हवे, असे ते म्हणाले आहेत. दिवाळीनंतर शहरातील प्रदुषण अधिक वाढले आहे. त्यामुळे भारत-बांगलादेश यांच्यात होणाऱ्या टी-२० मालिकेतील सलामीच्या सामन्याबद्दल अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

'धक्काधक्की'त बांगलादेशचा संघ दिल्लीत दाखल

प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मुद्यावर गंभीर यांनी एएनआयला आपली प्रतिक्रिया दिली. 
गंभीर म्हणाले की, दिल्लीमध्ये होणारा क्रिकेट सामना किंवा इतर अन्य खेळ होणार का? यापेक्षा शहरातील वाढते प्रदूषण ही मोठी समस्या आहे. दिल्लीतील नागरिकांना क्रिकेट सामन्याची नाही तर प्रदूषणाबाबत चिंता असायला हवी, असे मत गंभीर यांनी व्यक्त केले आहे.  

रोहितच्या नेतृत्वाखाली यांना मिळेल कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी

दिल्लीतील प्रदूषण केवळ खेळाडूंसाठी नव्हे तर दिल्लीतील नागरिकांसाठी चिंतेचा विषय आहे. कोणताही सामन्याचा यापेक्षा महत्त्वपूर्ण असू शकत नाही. लहानांपासून थोर मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी प्रदूषण धोक्याचे आहे. दिल्लीतील प्रदूषणाचा स्तर पूर्वी पेक्षा बरा आहे, त्याचे श्रेय दिल्ली वासियांचे असून यावर आपल्याला आणखी मेहनत करावी लागेल, असेही गंभीर यावेळी म्हणाले. मला आगामी क्रिकेट सामन्यापेक्षा दिल्लीवासियांची अधिक चिंता असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.