पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पदार्पणात सामनावीर ठरलेला सैनी कधी २५०-५०० रुपये मानधनावर खेळायचा

नवदीप सैनी

विंडीज दौऱ्याच्या पहिल्या टी-२० सामन्यात फ्लोरिडाच्या मैदानात भारतीय क्रिकेट संघाला एक नवा स्टार मिळाला. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय युवा गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करुन दाखवली. विंडीज विरुद्धच्या या सामन्यात नवदीप सैनीने आंतरराष्ट्रीय टी-२० च्या रुपात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

 

WI vs IND T20I : अमेरिकेत वाशिंग्टनच्या 'सुंदर' षटकाराने भारताचा विजय

भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० खेळणारा सैनी ८० वा खेळाडू आहे. आपल्या पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्याच षटकात त्याने लागोपाठ दोन गड्यांना माघारी धाडले. या सामन्यात त्याने ४ षटकात एका निर्धाव षटकासह १७ धावा खर्च करत ३ महत्त्वपूर्ण बळी मिळवत विंडीजचे कंबरडे मोडले. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. सैनीचं कारकिर्द फार मोठी नाही. हरियाणाचा नवदीप सहा वर्षांपूर्वी टेनिस बॉलवर २५० ते ५०० रुपये प्रति सामना प्रमाणे एखाद्या स्थानिक संघातून खेळायचा. गौतम गंभीरने त्याचा खेळ पाहिला आणि त्याचे आयुष्याला कलाटणी मिळाली.

Ashes 2019 : स्टम्पला चेंडू लागूनही जो रुट नाबाद!

२०१३ मध्ये गंभीरला त्याने प्रभावित केले. त्यानंतर गंभीरने दिल्ली रणजी सघाच्या निवड समितीकडे त्याला संधी देण्याबाबत विचारणा केली. मात्र निवड समितीचे सदस्य त्याला स्थान देण्यासाठी फारसे उत्सुक नव्हते. अखेर गंभीरच्या अथक प्रयत्नानंतर त्याला दिल्लीच्या संघात स्थान मिळाले. सैनीच्या दमदार पदार्पणानंतर भारताचे माजी सलामवीर आणि भाजपचे विद्यमान खासदार गौतम गंभीर यांनी ट्विटरच्या माध्यमातून सैनीला विरोध करणाऱ्या निवड समितीच्या सदस्यांनाना टोला लगावला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Gautam Gambhir blasts Bishan Singh Bedi and Chetan Chauhan after Navdeep Sainis impressive debut against West Indies