पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

WI vs IND : पंत की साहा? चर्चेवर गंभीर यांच परखड मत

गंभीरची पंतला पसंती

भारताचा माजी कर्णधार धोनीनंतर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात यष्टिरक्षक ऋषभ पंत पहिली पसंत असेल, अशी भूमिका विंडीज दौऱ्यापूर्वीच निवड समितीने स्पष्ट केली. धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पंतकडे पाहिले जात आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर खास करुन तो कसोटीसाठी परिपक्व आहे का? याबाबत चर्चा सुरु आहे. 

विश्वचषक स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्यफेरीतील सामन्यात आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत पंत चुकीच्या पद्धतीने फटकेबाजी करताना बाद झाला. त्यामुळे त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पंतच्या सुमार कामगिरीचा दाखला देत काही दिग्गज मंडळी कसोटीमध्ये ऋषभ पंत ऐवजी वृद्धीमान साहाला संधी मिळायला हवी, असे मत व्यक्त करत आहेत.    

WI vs IND : कोहलीला खुणावतोय आणखी एक 'विराट' विक्रम

भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि भाजपचे विद्यमान खासदार गौतम गंभीर यांनी यावर आपले मत व्यक्त केले. मागील कसोटी सामन्यात पंतने चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे  वृद्धिमान साहाला थोडी प्रतिक्षा करावी लागेल, असे गंभीर यांनी म्हटले आहे. पंतने ४५.४३ च्या सरासरीनें धावा करत आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्याने शतकी खेळी करुन दाखवली आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेट संघातील जागेवर पंतचा अधिकार आहे. 

भुवनेश्वरमध्ये रंगणार १७ वर्षांखालील महिला फिफा विश्वचषक स्पर्धा

यापूर्वी भारताचे माजी क्रिकेटर सईद किरमानी यांनी पंत ऐवजी साहाला संधी मिळायला हवी, अशी प्रतिक्रिया दिली होती. दुखापतीमुळे साहा संघाबाहेर होता. त्यामुळे विंडीज दौऱ्यावर त्याला खेळवण्यास प्राधान्य द्यायला हवे, असे किरमानी म्हणाले होते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Gautam Gambhir bats for Rishabh Pant over Wriddhiman Saha in Indian Test Cricket Team considering his past performances