पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय?

सौरव गांगुली

भारतीय क्रिकेट संघाची खऱ्या अर्थाने बांधणी करणाऱ्या सौरव गांगुली यांनी बुधवारी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. जवळपास पाच वर्षे भारतीय संघाचे नेतृत्व केल्यानंतर बीसीसीआयच्या सर्वोच्चस्थानी विराजमान होणारे गांगुली पहिले क्रिकेटर आहेत. मात्र त्यांचा कार्यकाळ महिन्याचा असेल. त्यानंतर त्यांना प्रशासक पदावरुन बाजूला व्हावे लागेल. ठराविक कालावधीपर्यंत त्यांना पुन्हा प्रशासक म्हणून भूमिका बजावता येणार नाही. यालाच कूलिंग ऑफ पीरियड म्हणून संबोधले जात आहे. जाणून घेऊयात 'कुलिंग ऑफ पीरियड' म्हणजे नेमक काय?    

सौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला

लोढा समितीने सर्वोच्च न्यायालयाला भारतीय क्रिकेटबाबत काही शिफारशी केल्या आहेत. बीसीसीआयसाठी या शिफारशींचे पालन करणे अनिवार्य आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमावलीनुसार, एखाद्या व्यक्तीला बीसीसीआय किंवा त्याच्या संलग्नित क्रिकेट मंडळामध्ये प्रशासक म्हणून केवळ सहा वर्षे पदभार सांभाळता येऊ शकतो.

प्रशासक म्हणून सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला ते पद सोडावे लागते. त्यानंतर ३ वर्षे त्याला कोणतेही पद भूषवता येत नाही.  बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होण्यापूर्वी गांगुली यांनी पश्चिम बंगालचे अध्यक्ष आणि सचिव पदासह बीसीसीआयच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षस्थानी होते. त्यामुळे गांगुली यांचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा ९ महिन्यांचा असणार आहे. सप्टेंबर २०२० पासून गांगुली यांचा कूलिंग ऑफ पीरियड सुरु होईल. त्यानंतर पुढील तीन वर्षे त्यांना बीसीसीआय किंवा संलग्नित मंडळाचे प्रशासक म्हणून काम करता येणार नाही.

INDvSA: विजयानंतर धोनीनं घेतली टीमची भेट, बीसीसीआयनं म्हटलं..

आयपीएलमध्ये २०१३ मध्ये झालेल्या स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाने क्रिकेट पारदर्शी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली होती. लोढा समितीने बीसीसीआयचे अधिकारी, खेळाडू आणि आयपीएलमधील समभागधारकांबरोबर ३८ बैठका केल्या. त्यानंतर या सामितीने १५९ पानांचा शिफारशींचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर केला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ganguly is likely to serve only 9 months as BCCI president as the Cooling Off period clause in the new BCCI constitution