पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताच सौरव गांगुली घेणार हा मोठा निर्णय

सौरव गांगुली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांची निवड झाली आहे. आता औपचारिकपणे येत्या २३ ऑक्टोबरला सौरव गांगुली अध्यक्षपदाचा पदभार सांभाळतील. त्यांनी ही जबाबदारी सांभाळल्यानंतर सर्वांत महत्त्वाचा निर्णय कसोटी क्रिकेटमध्ये रात्र-दिवस (डे-नाईट) सामने खेळण्यासंदर्भात घ्यावा लागणार आहे. भारतीय क्रिकेट संघाने याआधी डे-नाईट कसोटीसाठी संघाला सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला पाहिजे, असे म्हटले होते. आता सौरव गांगुली काय भूमिका घेतात हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. पण जर विश्व चॅम्पियनशीपमध्ये डे-नाईट कसोटी सामने खेळले जाणार असतील, तर भारताने त्यामध्ये मागे नाही राहिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; हर्षवर्धन जाधवांच्या घरावर दगडफेक

आपल्या कार्यसूचीमध्ये डे-नाईट कसोटी खेळण्यासंदर्भातील निर्णय अग्रक्रमावर राहिल, असे सौरव गांगुली यांनी आयएएनएस वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. गांगुली म्हणाले, आम्ही यावर नक्कीच काम करू. काम नक्की कशा स्वरुपाचे असेल, हे आताच सांगता येणार नाही. पण मला आधी कार्यभार स्वीकारू दे. त्यानंतर या मुद्द्यावर आम्ही नक्कीच काम करू.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गेल्यावर्षी वेस्ट इंडिजविरोधात डे-नाईट कसोटी सामना खेळायला तयार झाले होते. पण नंतर त्यांनी प्रशासकांच्या समितीला पत्र लिहिले. त्यामध्ये त्यांनी संघ यासाठी तयार नसल्याचे म्हटले होते. संघाला यासाठी सराव करावा लागेल. त्यासाठी १२ ते १८ महिन्यांचा कालावधी लागेल, असे पत्रात म्हटले होते. 

सौदी अरेबियामध्ये भीषण अपघात, ३५ जणांचा मृत्यू

कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेत डे-नाईट कसोटी सामने खेळण्याबद्दलची तरतूद नाही. त्यामुळे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्री किंवा कर्णधार विराट कोहली याला तयार नाहीत. पण कसोटी सामने डे-नाईट स्वरुपात होणारच नाहीत, असे मानणे चुकीचे ठरेल, असे सौरव गांगुली यांनी म्हटले आहे.