पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

French Open 2019: विक्रमी १२ व्यावेळी नदाल फायनलमध्ये

राफेल नदाल (REUTERS)

लाल मातीचा बादशाह समजला जाणारा स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल याने पुरुष गटात सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारा स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला पराभूत केले. नदालने फेडररला सरळ सेटमध्ये ६-३, ६-४, ६-२ असा पराभव केला. नदालने फेडररला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही.  

पाक क्रिकेट संघाचे अभिनंदन केल्यामुळे सानिया मिर्झा पुन्हा ट्रोल

११ व्यांदा फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावलेल्या ३३ वर्षीय नदालने १२ व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केले आहे. अंतिम फेरीत विजय मिळवण्यात नदाल यशस्वी ठरल्यास तो एकच ग्रँड स्लॅमचे जेतेपद सर्वाधिक वेळा पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या मार्गरेट कोर्टचा विक्रम मोडेल. महिला खेळाडू कोर्टने १९६० ते १९७३ दरम्यान ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीचे जेतेपद पटकावले होते.

करिअरमध्ये २० ग्रँड स्लॅम किताब जिंकणारा फेडरर हा कोणत्याही मोठ्या मालिकेतील सेमीफायनलमध्ये पोहोचणारा सर्वाधिक वयाचा खेळाडू ठरला आहे. हा विक्रम अमेरिकेच्या जिमी कॉनर्सच्या नावावर होता. 

नदालने क्वार्टर फायनलमध्ये जपानच्या केई निसिकोरीचा ६-१,६-१,६-३ असा पराभव केला होता. तर फेडररने आपल्याच देशातील स्टान वावारिंकाचा चार सेटपर्यंत चाललेल्या चुरशीच्या सामन्यात ७-६ (७-४), ७-६ (७-५), ६-४ असा पराभव करत सेमी फायनलमध्ये धडक मारली होती.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:French Open 2019 Rafael Nadal hands Roger Federer worst Grand Slam loss in 11 years to reach final