पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

French Open 2019: नदालचा नाद खुळा ! हॅटट्रिकसह 'अब तक बारा'

राफेल नदाल

स्पेनचा टेनिस स्टार राफेल नदालने ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमला पराभूत करत पुन्हा एकदा आपणच लाल मातीचा बादशहा असल्याचे दाखवून दिले. सलग तिसऱ्यांदा फ्रेंच ओपनचा किताब जिंकत त्याने विक्रमी बारा वेळा ही स्पर्धा गाजवण्याचा  पराक्रम आपल्या नावे केला आहे. कोणत्याही एका ग्रँडस्लँमवर दहापेक्षा अधिकवेळा आपले नाव कोरणारा नदाल हा एकमेव टेनिसपूट आहे.

French Open: महिला एकेरीचे जेतेपद ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅश्ले बार्टीला

३३ वर्षीय नदालने १८ वी ग्रँडस्लम आपल्या नावे केली आहे. या विजयानंतरही नदाल फेडररसोबतच्या शर्यतीत दोन किताबांनी मागे आहे.  जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रियाच्या २५ वर्षीय थमी आणि नदाल यांच्यात तब्बल ३ तास १ मिनिटे सामना रंगला. यात नदालने ६-३, ५-७, ६-१,६-१ अशी बाजी मारली. दुसऱ्यावेळेला ग्रँडस्लॅम किताबाने थीमला हुलाकवणी दिली आहे. मागील वर्षी नदालने थीमला पराभूत करतच हा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. 

French Open 2019: विक्रमी १२ व्यावेळी नदाल फायनलमध्ये

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:French Open 2019 Final Rafael Nadal vs Dominic Thiem Nadal wins Match With 12th french open title