पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

French Open Tennis: थीमकडून जोकोविच पराभूत, फायनलमध्ये नदालशी लढत

नोव्हाक जोकोविच (REUTERS)

French Open Tennis फ्रेंच ओपन टेनिसमध्ये ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमने सर्बियाच्या नोव्हाक जोकेविचला ६-२, ३-६, ७-५, ५-७, ७-५ असे पराभूत केले. फायनलमध्ये थीमचा सामना आता स्पेनच्या राफेल नदालशी होईल. मागीलवर्षीही या दोघा खेळाडूंमध्येच फायनलचा सामना खेळला गेला होता. यामध्ये नदालने बाजी मारली होती.

नदालने सेमीफायनलमध्ये स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडररला पराभूत केले होते. या विजयाबरोबरच नदालने २६ व्या वेळी ग्रँडस्लॅमच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 

French Open 2019: विक्रमी १२ व्यावेळी नदाल फायनलमध्ये

दोन दिवस चालला सामना

दोन्ही खेळाडूंमध्ये शुक्रवारी सेमीफायनलचा सामना सुरु झाला होता. खराब हवामानामुळे सामना थांबवावा लागला होता. शुक्रवारी थांबलेला सामना शनिवारी पूर्ण झाला. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या थीमने एकही ग्रँड स्लॅमचे जेतेपद पटकावलेले नाही.