पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL 2019 : मुंबई इंडियन्सच्या नावे खास विक्रमाची नोंद

मुुंबई इंडियन्स संघाचा विक्रमी धडाका

चेन्नई येथील चेपॉकच्या मैदानात धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईला पराभूत करत मुंबईने बाराव्या हंगामातील आयपीएल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. या विजयासह मुंबई इंडियन्सने अनेक विक्रम आपल्या नावे नोंदवले आहेत. मुंबईने सातत्याने चारवेळा धोनीच्या संघाला पराभूत करण्याचा पराक्रम केला आहे. 

यापूर्वी २०१८ च्या आयपीएल हंगामात पुण्याच्या मैदानात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला ८ गडी राखून पराभूत केले. त्यानंतर यंदाच्या हंगामात वानखेडेच्या मैदानात मुंबई इंडियन्सने ३७ धावांनी चेन्नईला पराभूत केले. यापूर्वी साखळी फेरीत झालेल्या सामन्यातही घरच्या मैदानात चेन्नईला ४६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. क्लालिफायर १ च्या सामन्यातही चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई इंडियन्सने या सामन्यातील विजयासह चेन्नईला सातत्याने चारवेळा पराभूत करण्याचा पराक्रम आपल्या नावे केला.  

चेपॉकच्या मैदानात मुंबई चेन्नईपेक्षा भारी

आपल्या घरच्या मैदानावर धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने खेळलेल्या अखेरच्या २१ सामन्यांपैकी तब्बल १८ सामने हे चेन्नईने जिंकले आहेत. घरच्या मैदानावर त्यांनी आपले वर्चस्व राखले. पण मुंबई विरुद्ध मात्र त्यांना यश मिळाले नाही. घरच्या मैदानावर चेन्नईने जे तीन सामने गमावले आहेत ते सर्व सामने मुंबई इंडियन्सविरुद्धचे आहेत.

IPL 2019, चेन्नई एक्स्प्रेसपूर्वी मुंबई लोकल फायनल स्टेशनला!

आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यामध्ये चेन्नईचा संघ आघाडीवर आहे. त्यांनी तब्बल सातवेळा आयपीएल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. या यादीत मुंबई इंडियन्स दुसऱ्या स्थानावर आहे. आजचा सामना जिंकत मुंबईने पाचव्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. या यादीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. बंगळुरुने तीनवेळा आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.