पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

या दोघांच्या जोरावर भारतच विश्वचषक जिंकेल, दिग्गजाची भविष्यवाणी

भारतीय संघ

इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणाऱ्या विश्वचषक स्पर्धा कोणता संघ गाजवणार याची चर्चा आता जोर धरु लागली आहे.  वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटर मायकल होल्डिंग यांनी यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघाला पसंती दिली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्डकप जिंकेल, अशी भविष्यवाणी त्यांनी केली आहे.  

विश्वचषकात सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम घडण्याचा संकेत

भारतीय संघाच्या विजयात कोणता मोहरा चालणार याचा अंदाज देखील त्यांनी बांधला आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि डेथ ओव्हर्स स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराह यांच्या जोरावर भारत दमदार कामगिरी करेल, असेही त्यांनी म्हटले आहे. 'द टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार मायकल होल्डिंग म्हणाले की, 'यंदाच्या विश्वचषकात विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली क्षमता आहे. ते भारतीय संघाला तिसऱ्यांदा विश्वचषक मिळवून देऊ शकतील.' 

पाटा खेळपट्टीवरही आम्ही क्षमता सिद्ध करु : भुवनेश्वर

कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९८३ मध्ये जिंकलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मायकल होल्डिंग हे  मोहिंदर अमरनाथ यांच्या गोलंदाजीवर बाद होणारे वेस्ट इंडिजचे शेवटचे फलंदाज होते. ३० मे पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये १३ वी विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. भारत स्पर्धेतील आपला पहिला सामना दक्षिण आफ्रिकेसोबत खेळणार आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:former windiest cricketer michael holding predicts team india as top runner of world cup 2019 title named virat kohli and jasprit bumrah