पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लक्ष्मण यांनी केली धोनीसंदर्भात भविष्यवाणी!

महेंद्रसिंह धोनी

यंदाच्या आयपीएलच्या १३ व्या हंगामावर संध्या कोरोना विषाणूचे सावट आहे. स्पर्धा होणार की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. आयपीएल स्पर्धा झाली नाही तर धोनीच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाचे काय होणार? असा प्रश्न धोनीच्या तमाम चाहत्यांना पडला आहे. आयपीएमधील कामगिरी पाहून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-२० वर्ल्ड कपमध्ये धोनीचा समावेश होऊ शकतो, असे संकेत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले होते. मात्र आयपीएल स्पर्धेवर संकट घोंगावत असल्यामुळे महेंद्रसिंह धोनीच्या पुनरागमनाबाबत पुन्हा एकदा तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.

अर्जुनने केली प्रतिस्पर्धी फलंदाजांचे हेल्मेट फोडण्याची 'बात'

भारताचे माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी धोनीसंदर्भात भविष्यवाणी केली आहे. धोनी आयपीएलमध्ये पुढील दोन-तीन हंगामात खेळताना दिसेल, असे लक्ष्मण यांनी म्हटले आहे.   स्टार स्पोर्ट्सवरील क्रिकेट कनेक्ट शोमध्ये ते बोलत होते. लक्ष्मण म्हणाले की, मला वाटते चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत राहणे धोनीसाठी फायदेशीर ठरेल. वय हा फक्त आकड्यांचा खेळ असल्याचे सांगत धोनी शारिरिक दृष्ट्याच नव्हे तर मानसिकरित्याही एकदम फिट असल्याचे लक्ष्मण यांनी म्हटले आहे. भविष्यात काय करायचे  आणि कधी  थांबायचे याबाबत धोनीच्या मनात कोणताही  संभ्रम नसेल. २०१९ च्या विश्वचषकावेळीच त्याने प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीसोबत कारकिर्दीतील भविष्यातील वाटचालीसंदर्भात चर्चा केली   असेल, असा अंदाजही लक्ष्मण यानी व्यक्त केला.

३६ वर्षांपूर्वी याच दिवशी पाकला नमवत टीम इंडियाने पहिल्यांदा उंचावला होता आशिया चषक

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Former Team India batsman VVS Laxman shared his views on how playing for Chennai superkings csk will keep MS Dhoni going on