पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शुक्रिया! पाकची माजी कर्णधार सना मीरचा क्रिकेटला अलविदा

सना मीर

पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार सना मीर हिने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृतीची घोषणा केली. ३४ वर्षीय सना मीरने आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत २२६ आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानी महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व केले. यातील २००९  ते २०१७ दरम्यान तिने १३७  सामन्यात पाक महिला संघाच्या नेतृत्वाची धूरा सांभाळली होती.  
सना म्हणाली की, मागील काही महिन्यांपासून निवृत्तीसंदर्भात विचार करायला वेळ मिळाला. आतापर्यंत मी संघासाठी सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न केला. निवृत्तीचा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे, असे सांगत तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्याचे जाहीर केले.

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्थगित करा : बीसीसीआय

संघ सहकारी, स्टाफ कर्मचारी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केलेल्या सहकार्याबद्दल मी या सर्व मंडळींची आभारी आहे, असेही तिने म्हटले आहे. खेळाला प्रोत्साहन देणाऱ्या कुटुंबियांचेही तिने आभार मानले. कुटुंबियांनी मला खेळाची परवानगी दिली हे मी माझे भाग्य समजते. त्यांच्यामुळेच माझी स्वप्नपूर्ती शक्य झाली, अशी भावनाही तिने यावेळी व्यक्त केली. सना मीरने पाकिस्तानकडून खेळताना १२० एकदिवसीय सामन्यात १०१ विकेट घेतल्या आहेत. १०६ टी-२० सामन्यात तिच्या खात्यात ८९ विकेट्स जमा आहेत. पाकिस्तान महिला संघाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सना मीर तिसऱ्या स्थानावर आहे. तिच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ हजार ६३० धावांची नोंद आहे.  

टीम इंडियाला आम्ही नेहमीच पराभूत करायचो, इम्रान यांचा व्हिडिओ व्हायरल

५ जानेवारी १९८६ मध्ये पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या सनाने २८ डिसेंबर २००५ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ४  नोव्हेंबर  २०१९   मध्ये तिने बांगलादेशविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. सनाने २०१३   आणि २०१५ मध्ये झालेल्या विश्वचषकात पाक महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. याशिवाय तिने आयसीसी महिला विश्वचषकात, २००९,२०१०,२०१२,२०१४ आणि २०१६ असे तब्बल पाचवेळा नेतृत्व केले.