पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दादाचा दाखला देत इंजमाम यांची 'त्या' धार्मिक भेदभावावर प्रतिक्रिया

इंझमाम आणि गांगुली (संग्रहित छायाचित्र)

पाकचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने मॅच फिक्सिंगप्रकरणी निलंबनाची शिक्षा भोगणाऱ्या दानेश कानेरिया विषयीच्या वक्तव्यावरुन वातावरण चांगलेच तापवले आहे. दानेश कानेरिया हिंदू असल्यामुळे त्याच्यासोबत भेदभाव केला जायचा, असे वक्तव्य अख्तरने केले होते. त्यानंतर क्रिकेट वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यात आता पाकचा माजी कर्णधार इंझमाम उल हकही मैदानात उतरले आहेत. 

लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत भारताचे पहिले CDS अधिकारी

दानेश कानेरिया माझ्या नेतृत्वाखाली जेव्हा संघासोबत होता तेव्हा असा कोणताही प्रकार घडला नव्हता, असे इंजमाम यांनी म्हटले आहे. दानेश कानेरिया माझ्या नेतृत्वाखाली सर्वाधिक सामने खेळला आहे. तो मुस्लीम नाही म्हणून त्याच्यासोबत संघातील सहकार्यांकडून भेदभाव करण्यात आल्याचे मी कधीही पाहिले नाही. यावेळी त्यांनी ख्रिचन धर्म स्वीकारलेल्या  मोहम्मद युसूफचाही दाखला दिला. 

उद्या किंवा परवा मंत्र्यांची खाती कळतील- उद्धव ठाकरे

याशिवाय इंजमाम यांनी २००५ मध्ये भारत दौऱ्यापूर्वीचा किस्साही शेअर केलाय. भारताच्या दौऱ्यापूर्वी कोलकातामध्ये एका शुटींगसाठी गलो होतो. त्यावेळी सचिन तेंडुलकरसोबत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने उघडलेल्या रेस्टॉरेंटचे उद्घाटन केले होते. सौरव गांगुली आपल्या रेस्टॉरेटमधून मला जेवणही पाठवायचा, ही आठवण सांगत भारतीय वंशाच्या आणि वेगळ्या धर्माच्या व्यक्तींशी आम्ही कधीच भेदभाव केला नाही, असे सांगण्याचा प्रयत्न इंझमाम यांनी केलाय.    

Wisdens T20i Decade: भारताचे दोन मोहरे संघात, पाकच्या एकाला स्थान नाही

शोएब अख्तरने केलेल्या वक्तव्यानंतर जावेद मियादांद यांनी दानेश कानेरियासोबत भेदभावाचे चर्चा फेटाळून लावली होती. पाकिस्तानची अल्पसंख्यांक हिंदू धर्मियांविरोधात भेदभावाची भावना असती तर दानेश कानेरियाला संघात कधीच स्थान मिळाले नसते, असे मियादांद यांनी म्हटले आहे. पाकिस्तान क्रिकेटमध्ये धर्मिकतेचा मुद्दा कधीच आला नाही, असे सांगत त्यांनी अख्तरच्या विधानाचा समाचार घेतला होता.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:former pakistan captain inzamam us haq rubbishes danish kaneria claims says sourav ganguly sent me food