पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टीम इंडियाला आम्ही नेहमीच पराभूत करायचो, इम्रान यांचा व्हिडिओ व्हायरल

इम्रान खान

भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघांची तुलना करताना माजी अष्टपैलू कपिल देव वर्सेस पाकचे विद्यमान पंतप्रधान इम्रान खान याच्यातील खेळीची चर्चा अनेकदा रंगल्याचे पाहायला मिळाले आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि पाकचा स्फोटक फलंदाज बाबर आझम यांची तुलना होताना दिसते. दोन्ही राष्ट्रांतील तणावामुळे अनेक वर्षांपासून दोन्ही संघातील द्विपक्षीय मालिकेला विराम लागला आहे. आयसीसीच्या स्पर्धेशिवाय दोन्ही संघ समोरासमोर येत नाहीत.

सचिनला शुभेच्छा देताना सेहवागने कोरोना लढ्यासंदर्भात दिला खास संदेश

नुकतेच पाकचे माजी कर्णधार इंजमाम यांनी भारतीय संघाविरुद्धचे किस्से शेअर केले होते. त्यानंतर आता पाकचे विद्यमान पंतप्रधान आणि माजी कर्णधार इम्रान खान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.  या व्हिडिओमध्ये इम्रान खान यांनी भारतीय संघाबाबत भाष्य केल्याचे दिसते. भारताच्या प्रति आम्हाला सहानुभूती आहे. कारण आम्ही त्यांना अनेकदा पराभूत केले आहे. क्रिकेटच्या मैदानात आमच्या विरोधात खेळताना भारतीय संघ नेहमी दबावात असायचा असे त्यांनी म्हटले आहे.

'आम्ही संघासाठी तर भारतीय खेळाडू स्वत:साठी खेळायचे'

क्रिकेटच्या इतिहासात भारत-पाक यांच्यातील सामना नेहमीच चर्चेत राहिला आहे. विश्वचषकात भारतीय संघाने पाकला एकदाही जिंकू दिलेले नाही. विश्वचषकाशिवाय भारत-पाक यांच्यात झालेल्या सामन्यात पाकचे पारडे जड आहे. १३२ पैकी ७३ एकदिवसीय सामन्यात पाकने बाजी मारली आहे. यात इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाक संघाविरोधात भारतीय संघाला अनेक सामने गमवावे लागले आहेत. याचाच संदर्भ देत इम्रान खान यांनी सॉरी पण आम्ही भारताला अनेकदा पराभूत केले, असे वक्तव्य  एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये  केले होते. 

दा ओरडत असताना कैफ म्हणाला होता की, मी पण खेळायला आलोय!

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना हा इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान पाहायला मिळाला होता. या सामन्यात रोहित शर्माच्या ११३ चेंडूतील १४० धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकात  ३३६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ६ बाद २१२  धावांपर्यंत मजल मारु शकला होता.  क्रिकेटच्या मैदानात सुरुवातीच्या काळात पाकचे वर्चस्व असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत असले तरी सध्याच्या घडीला पाकचा संघ भारतासमोर नेहमीच दबावात दिसला आहे.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Former Pakistan captain Imran Khan says i used to feel sorry for Indian team because we beat them so often watch video