पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

होय, हिंदू असल्यामुळेच मला पाक संघात भेदभाव सहन करावा लागलाः कनेरिया

दानिश कनेरिया आणि शोएब अख्तर

पाकिस्तानचा माजी लेगस्पिनर दानिश कनेरियाने पाक संघात तो हिंदू असल्यामुळे भेदभावाला सामोरे जावे लागल्याच्या शोएब अख्तरच्या आरोपांना दुजोरा दिला आहे. कनेरियाने 'एएनआय'शी बोलताना म्हटले की, शोएबने सत्य सांगितले आहे. मी हिंदू आहे म्हणून माझ्याशी न बोलणाऱ्या खेळाडूंची नावे मी लवकरच जाहीर करणार आहे. आतापर्यंत हे सर्व बोलण्याचे धाडस माझ्याकडे नव्हते. पण मी आता बोलणार आहे. 

पाकिस्तानी खेळाडूंना आशिया XI मध्ये 'नो एंट्री'

तत्पूर्वी, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आरोप केले होते की, माझा सहकारी राहिलेला खेळाडू दानिश कनेरियाबरोबर काही पाकिस्तानी क्रिकेटर्सनी पक्षपाती वर्तणूक केली. काहीजण त्याच्याबरोबर जेवणही करत नसत. कारण तो हिंदू होता. आपला मामा अनिल दलपत यांच्यानंतर पाकिस्तानकडून खेळणारा तो दुसरा हिंदू होता. कनेरियाने पाकिस्तानकडून खेळताना ६१ कसोटीत २६१ विकेट घेतल्या आहेत. शोएबने पीटीव्ही स्पोर्ट्सवर 'गेम ऑन है' कार्यक्रमात हे वक्तव्य केले. 

इंग्लंडच्या 'द क्रिकेटर' मासिकातही विराट ठरला या दशकातील राजा

तो म्हणाला, माझ्या करिअरमध्ये प्रादेशिक भेदभाव करणाऱ्या संघातील दोन-तीन खेळाडूंबरोबर मी वादही घातला. कोण कराचीतून आहे, कोण पंजाबमधून किंवा पेशावरमधून आहे, अशा प्रकारच्या चर्चा टीममध्ये होऊ लागल्या होत्या. कोणी हिंदू आहे म्हणून काय झाले, तो टीमसाठी चांगला खेळतोय, हे महत्त्वाचे आहे.

बुमराहसाठी दादानं प्रोटोकॉल ठेवला बाजूला

शोएब पुढे म्हणाला की, ते म्हणत असत की 'सर हा येथून जेवण कसा घेऊन जात आहे.' त्यावर मी त्यांना म्हणत असत की, या हिंदूनेच इंग्लंडविरोधात आपल्याला विजय मिळवून दिला आहे. तो जर पाकिस्तानसाठी विकेट घेत असेल तर त्याला खेळवले पाहिजे. आम्ही कनेरियाशिवाय मालिका जिंकू शकत नव्हतो. पण अनेक लोक त्याला याचे श्रेय देऊ इच्छित नसत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:former pakistan bowler danish kaneria says shoaib akhtar allegations are true will reveal the name soon