पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाच्या संकटामुळे वर्षभर क्रिकेट स्पर्धा होणे 'मुश्किल': अख्तर

भारत-पाक यांच्यातील लढतीमुळे या स्पर्धेची क्रिकेट चाहते  उत्सुकते वाट पाहत होते.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खेळाची मैदाने ओस पडली आहेत. क्रिकेटसह फुटबॉल, टेनिस आणि ऑलिम्पिक स्पर्धाही पुढे ढकलण्याची वेळ आली. कोरोनाचे वेगाने होणाऱ्या संक्रमणातून जग कधी सावरणार याचा अंदाज बांधणं सध्याच्या घडीला खूपच कठिण होऊन बसले आहे. याचाच आधार घेत पाकचा माजी क्रिकेटर आणि जलदगती गोलंदाज याने क्रिकेट स्पर्धांच्या भविष्याबद्दल अंदाज वर्तवला आहे. जवळपास वर्षभर क्रिकेटच्या मैदानावर अनिश्चिततेचे ढग कायम राहतील, असे शोएब अख्तरने म्हटले आहे. 

कोरोनाशी लढा : राज ठाकरे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा मुद्दा

आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून शोएबने क्रिकेटच्या खेळाला अच्छे दिन येण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागेल असे म्हटले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेविषयी अख्तर म्हणाला की, भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला असला तरी ऑस्ट्रेलियासमोर खेळताना नव्या जोमाने उभे राहण्याची क्षमता भारतीय संघात आहे. पण ही स्पर्धा नियोजित वेळेत होईल, असे वाटत नाही.  सध्याच्या परिस्थितीत क्रिकेटची कोणतीही स्पर्धा नियोजित वेळेप्रमाण होईल, असे वाटत नाही. जवळपास वर्षभर आपल्याला क्रिकेट पाहण्यासाठी प्रतिक्षा करावी लागेल, असे भाकित अख्तरने यावेळी केले.  

रेल्वे, हवाई वाहतूक ३ मे पर्यंत बंद राहणार

चीनच्या वुहानमधून जगभरात वेगाने पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे अनेक स्पर्धा स्थगित करण्याची वेळ आयोजकांवर आली आहे. जगभरातील वीस लाखहून अधिक लोक कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकले आहेत. एक लाखाहून अधिक लोकांचा या विषाणूने बळी घेतला आहे. भारतातील लोकप्रिय आयपीएल स्पर्धेशिवाय ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकावरही सध्या कोरोनाचे सावट दिसत असून ही स्पर्धाही होण्याची शक्यता धूसर वाटत आहे. त्यात अख्तरने पुढील वर्षभर हे संकट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Former Pak Pacer Shoaib Akhtar predicts No cricket for next one yea amid COVID 19 pandemic