पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड-१९ : माजी ऑलिम्पिक चॅम्पियन कोरोनाग्रस्तांवरील उपचारात व्यग्र

डॉक्टर आणि लंडन ऑलिम्पिक चॅम्पियन जोयसे सोमब्रेएक

२०१२ मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारी नँदरलंड हॉकी संघाची गोलकिपर जोयसे सोमब्रेएक सध्या डॉक्टरच्या नात्याने कोरोनाग्रस्तांवर उपचाराच व्यग्र आहे. लंडन ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदकाशिवाय जोयसेनं २०१४ मध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्येही सुवर्ण कामगिरी केली होती. खेळाच्या मैदानात विशेष छाप सोडणाऱ्या जोयसेनं वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी तिने खेळाच्या मैदानातून निवृत्ती घेतली. त्यानंतर तिने एम्सटरडमच्या विज्रे यूनिवर्सिटीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. 

कोविड- १९ : २४ तासांत विशेष तज्ज्ञांच्या समितीसह पोर्टल सुरु करा : SC

खेळाच्या मैदानात संघासाठी गोल तटवणारी जोयसे डॉक्टरच्या रुपात आजा कोरोनाच्या जाळ्यात अडकलेल्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सुरक्षा कवच घालून आपली ड्युटी बजावत आहे. जोयसे हिने नँदरलंड महिला हॉकी संघाकडून २०१० ते १६ दरम्यान एकूण ११७ सामने खेळले आहेत. तिचा सर्वोत्तम गोलकिपर म्हणून विशेष ओळख होती. जोयसेने एफआयएच वेबसाइटला दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मेडिसिन, कार्डीओलॉजी अशा अंतर्गत विभागात काम केले.

कोरोना इम्पॅक्ट : सरकारी कर्मचाऱ्यांच्या, आमदारांच्या वेतनात मोठी कपात

एम्सटरडमच्या मोठ्या रुग्णालयात आपातकालीन कक्षात काम करण्याचा अनुभवही तिच्याकडे आहे. टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलण्याच्या संदर्भातही जोयसे हिने प्रतिक्रिया दिली होती. सुरुवातीच्या काळा मलाही ऑलिम्पिक स्थगितीची वेळ येणार नाही असे वाटत होते. पण सध्याची परिस्थिती बिकट असून ऑलिम्पिक संघटनेचा निर्णय योग्य असल्याचे प्रतिक्रिया तिने दिली होती.