पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊन: लेकीला व्यग्र ठेवण्यासाठी हॉकीपटूने लढवली शक्कल! पाहा VIDEO

हॉकीपटूने शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

कोरोना विषाणूच्या थैमानामुळे देशात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संक्रमणाला रोखण्यासाठी घरात बसण्याच्या सूचना सरकार आणि प्रशासनाकडून देण्यात येत आहे. सरकार आणि प्रशासनाचा हा नियम लहान मुलांना सांगणे कठीणच आहे. त्यांना घराबाहेर जाण्यापासून रोखणे पालकांसमोरील एक कसोटीच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी वयोवृद्ध आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्या, असा सल्ला भारतवासियांना दिला असून याची अंमलबजावणी करण्यासाठी पालकांना कसरत करावी लागत आहे. 

मुंबईत कोरोनाचा आणखी एक बळी; ७८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू

भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधाराने आपल्या लेकीने घरातून बाहेर पडू नये, यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. वीरेन रास किन्हा याने घरातील सामना पसरवून मुलीसाठी एक अनोखा टास्क तयार केलाय. घरातील या पसाऱ्यातून वाट काढण्याची मुलीची सुरु असलेली धडपड त्याने व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीत अशा प्रकारे वेगवेगळी शक्कल लढवूनच तुम्हाला मुलांना घरात बसवावे लागेल, असा संदेशच त्याने या व्हिडिओच्या माध्यमातून दिलाय.  

अश्विनी भिडे यांच्याकडे कोविड १९ प्रतिबंध व्यवस्थापनाची जबाबदारी

सोशल मिडियावर या व्हिडिओला चांगली पसंती मिळत आहे. ज्यांच्या घरी लहान मुले आहेत आणि ज्यांना त्यांना घरात कसे थांबवून ठेवायचा हा प्रश्न पडला आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास असाच आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत असून यावर मात करण्याच्या हेतून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. घरात थांबून आपण कोरोनावर मात करायची आहे, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. नागरिकही याला चांगल्यापद्धतीने प्रतिसाद देताना दिसत आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:former indian hockey captain viren rasquinha Keeping his little daughter busy with a home obstacle course during lockdown watch video