पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टीम इंडियाच्या चौथ्या क्रमांकाच्या तिढ्यावर बांगर यांनी सोडले मौन

संजय बांगर आणि रवी शास्त्री

भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी भारतीय संघातील चौथ्या क्रमांकाच्या तिढ्यावर पहिल्यांदाच भाष्य केले. यावेळी पदावरुन हटवल्याप्रकरणी त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली असून आपल्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने चांगली कामगिरी केली याचा अभिमान वाटतो, हे त्यांनी आवर्जून सांगितले. 

...म्हणून सोनम कपूरचा 'द झोया फॅक्टर' धोनीला समर्पित

आपल्या पाच वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानंतरही त्यांना पदावरुन काढून टाकण्यात आले. बीसीसीआयने रवी शास्त्री यांच्यासह इतर स्टाफला पुन्हा संधी देण्यात आली. मात्र बांगर यांची उचलबांगडी करण्यात आली होती. बांगर यांच्या जागी विक्रम राठोड यांना फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. बांगर यांच्या कार्यकाळात चौथ्या क्रमांकावरील फलंदाजीचे समस्या चांगलीच चर्चेचा विषय ठरली होती.

पाक पुन्हा तोंडावर आपटले, लंकेच्या मंत्र्यांनी दिला दहशतवादाचा दाखला

त्यांच्या कार्यकाळात लोकेश राहुल आणि विजय शंकर चौथ्या क्रमांकावर संधी देण्यात आली. मात्र ते फारसे यशस्वी ठरले नाहीत. यावर बांगर यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. चौथ्या क्रमांकावरील फलंदाजीचा प्रयोग हा केवळ माझ्यावर अवलंबून नव्हता. संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने यासाठी खेळाडू निवडले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Former India batting coach Sanjay Bangar says team management and selectors were part of decision on No 4 spot