पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारत-पाक यांच्यातील मालिकेवर दिग्गज क्रिकेटरची तिखट प्रतिक्रिया

भारत-पाक यांच्यात सेमीफायनल

कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी जमा करण्याच्या उद्देशाने भारत-पाक यांच्यात तीन सामन्यांची मालिका खेळवावी, असे मत पाकचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केले होते. यावर भारतीय दिग्गजांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारताचे माजी क्रिकेटर मदन लाल यांनी शोएब अख्तरला यावर बोलण्याचा कोणताही अधिकार नसल्याचा टोला लगावलाय.  

कोविड -१९: मदत निधीसाठी भारत-पाक यांच्यात मालिका खेळवावी : अख्तर

भारत-पाक यांच्यातील मालिका खेळवावी की नाही याचा निर्णय घेण्याचे अधिकार हे सरकारला आहेत, असेही मदन लाल यांनी म्हटले आहे. दोन्ही देशातील सरकारच यावर बोलू शकते. एका व्यक्तीला वाटण्याने दोन्ही देशातील क्रिकेटचे संबंध सुरळीत होणार नाहीत,असेच त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून सांगितले आहे. ते पुढे म्हणाले, बीसीसीआयने  पाकिस्तानसोबत खेळायला तयारी दर्शवली तरी याचा अंतिम निर्णय भारत सरकारच घेईल, असेही ते म्हणाले.  अख्तरने आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून भारत-पाक यांच्यात मालिका खेळवण्यासंदर्भातील मत व्यक्त केले होते. यावर भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनीही प्रतिक्रिया दिली होती. सध्याच्या घडीला कोरोनामुळे क्रिकेट स्पर्धाच नव्हे तर अनेक खेळ पूर्णपणे स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

लॉकडाऊनमध्ये BCCI कडून केंद्र सरकारला अशीही मदत

भारत-पाक यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचे तर 2002-03 पासून दोन्ही देशांतील द्विपक्षीय मालिकेला पूर्णविराम लागला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेतच दोन्ही संघ एकमेकांसोबत खेळताना पाहायला मिळते. पाकिस्तानने अनेकदा भारतासोबत खेळण्याची विनंती केली आहे. पण भारत सरकार याबद्दल राजी झालेले नाही. दहशतवादाच्या मुद्यावर पाक ठोस पावले उचलत नाही तोपर्यंत भारत-पाक यांच्यातील संबंध सुधारणार नाहीत, अशी भारत सरकारची भूमिका आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:former cricketer madan lal responds after kapil dev on shoaib akhtar proposal of india pakistan series