पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रशियन सुंदरीचा टेनिसला अलविदा!

मारिया शारापोव्हा

टेनिस कोर्टवरील आपल्या दमदार कामगिरीसह आपल्या अदाकारीने लाखो टेनिस चाहत्यांच्या मनात घर करणारी रशियन ब्यूटी मारिया शारापोव्हाने निवृत्ती घेतली आहे. ३२ वर्षीय मारियाने बुधवारी निवृतीची घोषणा केली. महिला टेनिसच्या जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी राहिलेल्या मारियाने पाचवेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा गाजवली आहे. 

स्टीव्हच्या चेहऱ्यावर पुन्हा 'कॅप्टन्सी'चं स्मित हास्य दिसणार

वयाच्या चौथ्या वर्षी आपल्या वडिलांसोबत टेनिसच्या कोर्टवर पाऊल टाकलेली मारिया गेल्या काही दिवसांपासून दुखापतीने त्रस्त होती. २०१२ मध्ये तिने लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती. मारियाने २००४ मध्ये विम्बल्डन स्पर्धा जिंकत कारकिर्दीतील पहिल्या ग्रँडस्लमवर नाव कोरले होते. त्यानंतर अमेरिकन ओपन (२००६), ऑस्ट्रेलियन ओपन (२००८), आणि २०१२ आणि २०१४ असे दोनवेळा फ्रेंच ओपन स्पर्धा गाजवली. एवढेच नाही तर जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या फोर्ब्सच्या यादीतही तिने छाप सोडली होती.  

टीम इंडियाचा 'गेम प्लॅन' समजण्यापलिकडचा : कपिल देव

२०१६ मध्ये मारियावर उत्तेजकद्रव्य सेवन केल्याचा ठपका पडला. मेलडोनियमच्या सेवनामुळे ‘वाडा’ अर्थात जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संघटनेने तिच्यावर बंदीची कारवाई केली होती. या कारवाईनंतर ती पुन्हा कोर्टवर उतरली पण दुखापतीमुळे ती खेळात सातत्य दाखवू शकली नाही. परिणामी क्रमवारीत तिची घसरण होत राहिली. अखेर तिने टेनिसमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: five times grand slam champion and former world number one-maria sharapova announces retirement