क्रिकेटपटू एस श्रीसंतच्या कोचीतील घराला शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमाराला आग लागल्याची घटना घडली. ही आग घरातील बेडरुम आणि हॉलमध्ये लागल्याचे सांगण्यात येते. या दुर्घटनेवेळी श्रीसंत घरात नव्हता. त्याची पत्नी, दोन मुली आणि दोन नोकर घरात होते. ही आग तळ मजल्यावर लागली होती. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे वृत्त आहे.
Kerala: A fire broke out at cricketer Sreesanth's house in Edappally, Kochi, earlier today. A room was gutted in it. No injuries have been reported. pic.twitter.com/EEznzOYuVC
— ANI (@ANI) August 24, 2019
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अग्निशामक दलाने काचेचा दरवाजा तोडून कुटुंबीयांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. शेजाऱ्यांनी अग्निशामक दलाला आग लागल्याची माहिती दिली. शेजाऱ्यांना श्रीसंतच्या घरातून धूर येताना दिसला. त्यानंतर त्यांनी त्वरीत पोलिस आणि अग्निशामक दलाला याची माहिती दिली.
फुटबॉल प्रेमी देशात मोदी म्हणाले, आमचे सरकार अशक्यप्राय 'गोल' करणारे
या आगीत एका खोलीचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागण्याचे कारण समजू शकलेले नाही.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी श्रीसंतवरील आजीवन बंदी हटवून ती ७ वर्षे करण्यात आली आहे. ही बंदी पुढीलवर्षी सप्टेंबरमध्ये संपुष्टात येईल. बंदी हटवल्यानंतर त्याने केरळकडून रणजी ट्रॉफी खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर एक दिवस पुन्हा एकदा आपल्याला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळेल अशी आशाही व्यक्त केली आहे.