पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

FIH सीरीज: फिजीची फजिती, ११-० विजयासह इंडियन क्विन्स सेमीफायनलमध्ये

भारतीय महिला संघाचा दमदार विजय

FIH महिला सीरीज फायनल्स स्पर्धेत फिजी संघाला ११-० अशा फरकाने पराभूत करत भारतीय महिला संघाने दिमाखात उपांत्यफेरी गाठली. जपानमधील हिरोशिमाच्या मैदानात मंगळवारी भारताचा साखळी फेरीतील तिसरा आणि अखेरचा सामना रंगला होता. जागतिक महिला हॉकीमध्ये नवव्या स्थानावर असलेल्या भारतीय महिलांनी स्पर्धेतील कमकुवत फिजीची चांगलीच फजिती केली. सामन्याच्या चौथ्या मिनिटात युवा स्ट्रायकर ललमेमसियामीने मारलेला चेंडू फिजीच्या बचाव फळतील खेळाडूच्या स्टीकची कड घेऊन गोलमध्ये परिवर्तित झाला. त्यानंतर दहाव्या मिनिटाला कर्णधार रानी रामपालने पेनल्टीचे रुपांतर गोलमध्ये करत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

पॅनल्टीतून फिजीच्या महिला सावरण्यापूर्वीच दुसऱ्या गोलनंतर अवघ्या एका मिनिटाच्या अंतराने नेहा गोयलने अप्रतिम पद्धतीने चेंडू मोनिकाकडे सोपला. मोनिकाने त्याचे गोलमध्ये रुपांतरित करत भारताची आघाडी ३-० अशी केली. बाराव्या मिनिटाला वंदना कटारियाने स्पर्धेतील दुसरा गोल डागत भारताची आघाडी ४-० अशी केली. पहिल्या कॉर्टरमधील शेवटच्या मिनिटात गुरजीतने पेनल्टीचे रुपांतर गोलमध्ये करत भारताचा स्कोअर ५-० असा केला. 

सामन्याच्या १९ व्या मिनिटाला फिजीच्या गोलरक्षकाने गुरजीतचा एक अप्रतिम फटका रोखला. हा क्षण सोडला तर फिजीच्या बाजूने एकही घटना म्हणावी तशी घडली नाही. त्यानंतर मिळालेल्या पॅनल्टीवर भारताच्या खात्यात आणखी एका गोलची भर घालत भारताची आघाडी ६-० अशी झाली. सहाव्या गोलनंतर अवघ्या दुसऱ्या मिनिटाला सातवा गोल डागत गुरजीतन आपली हॅटट्रिक पूर्ण केली. गुरजीतने २२ व्या मिनिटाला पॅनल्टीवर गोल करत फिजीवर आणखी एक वार केला. त्यानंतर तिसऱ्या कॉर्टरच्या सुरुवातीलाच मोनिकाने भारताच्या खात्यात ९ व्या गोलची नोंद केली. ५१ व्या मिनिटाला लालिमा आणि ५७ व्या मिनिटाला नवनीत कौरने भारताकडून अखेरचा गोल करत भारताला ११-० असा विजयावर शिक्कामोर्तब झाले.