पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...तर ऑलिम्पिक पात्रता फेरीतील भारत-पाक सामना युरोपात रंगेल

ऑलिम्पिक पात्रता फेरीत भारत-पाक सामना होण्याची शक्यता

टोकीयोमध्ये रंगणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या हॉकी पात्रता फेरीमध्ये भारत-पाकिस्तान संघ आमने सामने आले तर काय? याची चिंता दोन्ही राष्ट्रातील चाहते आणि खेळाडूंसह आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाला ही सतावत आहे. या दोन्ही देशातील घरच्या मैदानावरील सामने युरोपात खेळवण्याची तयारी आंतरराष्ट्रीय महासंघाकडून केली जात आहे.  

बेस्ट! महिला कंडक्टरच्या लेकराची युवा टीम इंडियात वर्णी

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ लवकरच पात्रता फेरीतील ड्रॉची यादी जारी करणार आहे. पाकिस्तानच्या हॉकी महासंघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होऊ शकते. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये टोकियो ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीसाठी खेळवण्यात येणाऱ्या सामन्यादरम्यान अव्वलस्थानावर असलेल्या संघांचा सामना हा क्रमवारीत खालच्या स्थानावर असलेल्या संघासोबत होणार आहे. भारत आणि पाकिस्तान संघाने प्रत्येकी एक-एक पात्रता सामना जिंकला आहे. ड्रॉमध्ये दोन्ही संघ पुन्हा एकदा समोरासमोर येऊ शकतात. 

IND vs WI: बुमराहचा भेदक मारा, हॅटट्रिकसह टिपले ६ बळी

ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्या;r सात संघांना संधी आहे. यात भारत, पाकिस्तान, दक्षिण कोरिया, स्पेन, जर्मनी, न्यूझीलंड, मिश्र यासह अन्य काही संघ पात्रता फेरीच्या मैदानात उतरतील. जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणावपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे पात्रता फेरीत हे संघ पुन्हा समोरासमोर आले तर त्यांच्यातील सामने युरोपात खेळवण्याबाबत आंतरराष्ट्रीय महासंघ विचार करत आहे.