पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

' लढवय्या पृथ्वी डोपिंगच्या धक्क्यातून सावरुन दमदार कमबॅक करेल'

पृथ्वी शॉ

टीम इंडियाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्याने त्याला ८ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर पृथ्वी शॉच्या चाहत्यांना धक्काच बसला होता. यावर आता पृथ्वीला सुरुवातीच्या काळात क्रिकेटचे धडे देणारे त्याचे प्रशिक्षक संतोष पिनगुटकर यांनी धीर दिला आहे. आपल्या लोकप्रिय शिष्य लढवय्या असून निलंबनाच्या कारवाईनंतर तो जोमाने पुनरागमन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.  

मुंबईहून जवळपास ६० किमी दूर असलेल्या विरामध्ये संतोष पिनगुटकर यांनी पृथ्वीला क्रिकेटचे प्रशिक्षण दिले आहे. ते म्हणाले की, पृथ्वी लढवय्या आहे. या धक्क्यातून तो नक्की सावरेल. इथेपर्यंत मजल मारण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतल्याचेही ते म्हणाले.  डोपिंग चाचणीत दोषी आढळल्यानंतर १९ वर्षीय पृथ्वी शॉवर निलंबनाची कारवाई केली.

डोपिंग चाचणीत दोषी आढळल्याने पृथ्वी शॉवर निलंबनाची कारवाई

निलंबनामुळे पृथ्वी शॉला १५ नोव्हेंबरपर्यंत क्रिकेटच्या मैदानापासून दूर रहावे लागणार आहे. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर पृथ्वीने आपली चूक मान्य केली होती. दुखापती दरम्यान औषधोपचारावेळी अनावधानाने वाडाने प्रतिबंधित केलेल्या उत्तेजक द्रवाचे सेवन झाल्याचे त्याने म्हटले होते. ही शिक्षा प्रत्येक खेळाडूला धडा देणारी ठरेल, असे पृथ्वीने म्हटले होते. 

अजिंक्य लवकरच 'बाप' माणूस होणार, फोटो शेअर करुन व्यक्त केला आनंद