पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरोधातील सामना निश्चित जिंकू : शास्त्री

रवी शास्त्री

कोरोना विषाणूविरोधातील सामना विश्व चषकातील एखाद्या सामन्यापेक्षाही महत्त्वपूर्ण असून हा लढा आपणच जिंकू, असा विश्वास भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केलाय. देशात कोरोना विषाणूने आतापर्यंत ३५० हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर ११ हजारहून अधिक लोक कोरोवा विषाणु ने विणलेल्या जाळ्यात अडकले आहेत. कोरोनाविरोधातील लढा जिंकण्यासाठी २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा कालावधी हा १९ दिवसांनी वाढवत ३ मे पर्यंत करण्यात आला आहे.

देशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

शास्त्री यांनी ट्विटच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करत कोरोना विषाणूच्या लढाईत झोकून देण्याची परिस्थिती जगावर ओढावल्याचे म्हटले आहे. सध्याच्या घडीला कोरोना विषाणू आपल्यावर आक्रमण करताना दिसत आहे. त्याचा सामना करणे म्हणजे विश्वचषक स्पर्धा जिंकण्यासाठी सर्व काही झोकून प्रयत्न करण्यापेक्षाही कठीण आहे.  
कोविड-१९ विरोधातील लढ्यात विश्वचषकाप्रमाणे ११ खेळाडू मैदानात नाही तर जगातील १ अब्ज ४० कोटी लोक मैदानात आहेत. कोरोना विरोधातील सामना म्हणजे मानवतेचा विश्वचषक आहे. आपण सर्वांनी एकत्रित येत  हा  सामना जिंकायचा आहे, असा असेही शास्त्रींनी म्हटले आहे.  

'कोरोनामुळे राज्यावर अर्थसंकट, बेरोजगारीचं प्रमाण वाढणार'

शास्त्रींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक केले. मोदी या लढ्यात योग्य तो निर्णय घेत आहेत. सरकारने जारी केलेल्या नियमांचे पालन करत आपल्याला त्यांना साथ द्यायची आहे. नियमांचे पालन करुन आपण कोरोनाविरोधातील लढा निश्चित जिंकू असे शास्त्रींनी म्हटले आहे. लॉकडाउनरच्या कालावधीत घरी राहून आपल्याला कोरोना विरोधातील लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान द्यायचे आहे, असे आवाहन देखील शास्त्रींनी केले आहे.