पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

FIFA Womens WC 2019: गुगल डूडलची फायनल 'किक'

गुगल डुडलच्या माध्यमातून ट्रेंड होतोय महिला फुटबॉल फिव्हर

फ्रान्समध्ये मागील २५ दिवसांपासून सुरु असलेल्या महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या आठव्या हंगामातील स्पर्धेचा रविवारी शेवट होतोय. युनायटेड स्टेट आणि नेदरलंड यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. यापार्श्वभूमीवर गुगलने खास डूडलच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन दिले आहे.   

युनायटेड स्टेटच्या महिलांनी उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सच्या महिलांना पराभूत केल्यानंतर उपांत्य सामन्यात त्यांनी इंग्लंड महिलांना पराभूत केले होते.  तर नेदरलंड महिलांनी उपांत्यापूर्व सामन्यात इटली आणि उपांत्य सामन्यात स्वीडनला मात देत अंतिम फेरी गाठली आहे.  

फिफा महिला विश्वचषकातील अंतिम सामना ६० हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या फ्रान्समधील ल्यों ओलंपिक स्टेडियममध्ये रंगणार आहे. रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होणार आहे. पुरुष फुटबॉलच्या तुलनेत महिला फुटबॉलच्या बक्षीसाची रक्कम खूपच अल्प आहे. २०१८ मध्ये झालेल्या पुरुष विश्वचषकात तब्बल ४४० मिलियन इतकी रक्कम बक्षिसावर खर्च करण्यात आली होती. यंदाच्या फिफा महिला विश्वचषकात ३० मिलियन एवढी रक्कम बक्षिसाच्या स्वरुपात असून विजेत्याला ४ मिलियन इतकी रक्कम देण्यात येणार आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: fifa womens world cup 2019 google doodle marks the finals of the eighth edition us vs netherlands