पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भुवनेश्वरमध्ये रंगणार १७ वर्षांखालील महिला फिफा विश्वचषक स्पर्धा

यापूर्वी १७ वर्षांखालील पुरुष फिफा स्पर्धा भारतात रंगली होती

२०२० मध्ये रंगणाऱ्या १७ वर्षांखालील महिला फिफा विश्वचषकाच्या आयोजनासाठी भुवनेश्वरला प्राथमिक मंजूरी मिळाली आहे. स्थानिक आयोजन समितीने यासंदर्भात माहिती दिली आहे. यावर स्पर्धेच्या संचालिका रोमा खन्ना म्हणाल्या की, भुवनेश्वर शहराला प्राथमिक मंजूर दिल्याचा आनंद आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून ओडिसाला एका मोठ्या स्पर्धेची संधी मिळाली आहे.यासंदर्भात अंतिम निर्णय अद्याप बाकी असून सध्याच्या स्टेडियममध्ये फिफाला आवश्यक ते बदल करावे लागतील. राज्याने आतापर्यंत जे काम केले याबद्दल आम्ही संतुष्ट आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.

सचिन तेंडुलकरने शेअर केलेल्या 'या' व्हिडिओचे होतेय कौतुक

ओडिसातील कलिंगा स्टेडियमवर पहिल्यांदाच फिफा विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. राज्याचे क्रीडा मंत्री तुषारकांती बेहरा म्हणाले की, आगामी १७ वर्षांखालील महिला फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी भुवनेश्वर शहराला मिळालेली प्राथमिक मंजूरी आनंददायी आहे. आतंरराष्ट्रीय महिला खेळासाठी देशातील पहिले व्यासपीठ होण्याचा मिळालेला मान राज्यासाठी अभिमानास्पद आहे. राज्यातील महिला खेळाडूंनी हॉकी, रग्बी आणि अन्य खेळात चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. फुटबॉलमध्ये देखील याची प्रचित पाहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

WI vs IND : कोहलीला खुणावतोय आणखी एक 'विराट' विक्रम

वर्षाखेरपर्यंत फिफाकडून भुवनेश्वरमधील यजमानपदासंदर्भातील अंतिम निर्णय अपेक्षित आहे. यापूर्वी २०१७ मध्ये फिफाच्या १७ वर्षांखालील पुरुष विश्वचषकाचे यजमानपद भारताला मिळाले होते.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:FIFA U 17 Womens World Cup India 2020 Bhubaneswar gets provisional clearance as 1st venue